पिंपरी-चिंचवड

पाणीसाठ्यात घट; मात्र पाणीटंचाई नाही

CD

पिंपरी, ता. २१ : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण पाणीसाठ्यात घट झाली आहे. सोमवारी (ता. २०) २७.२९ टक्‍के पाणीसाठा उपलब्ध असल्‍याची नोंद आहे. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्‍यास पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. साठ्यात घट असली तरी सध्या तरी पाणीटंचाईचे संकट नसल्‍याचे महापालिका प्रशासनाचे म्‍हणणे आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपातळीत वाढ न झाल्‍याने मागील साडेचार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन महापालिकेने आंद्रा धरणातून शंभर एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणण्यात येत आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून केवळ ५० एमएलडी पाणी निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असून, तक्रारींमध्ये वाढ होत आहे.

पवना धरणात सध्या २७.२९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्‍या वर्षी याच दिवशी २९.२७ टक्‍के पाणीसाठा होता. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत दोन टक्‍क्‍यांनी पाणी साठ्यात घट झाली असल्‍याची नोंद आहे. हा पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. सध्या नागरिकांना पुरेसे पाणी दिले जात असल्‍याचे महापालिका सांगत आहे. जून महिन्‍यापर्यंत पाऊस पडल्‍यास पाणीपातळीत वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यास शहराला पाणी कपातीच्‍या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. सध्या पाणीटंचाईची वेळ आली नसली तरी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाच्‍या वतीने करण्यात येत आहे.

पवना धरण पाणीसाठ्यात सध्या २७.२९ टक्‍के पाणीसाठा आहे. जूनपर्यंत पाणीसाठा पुरेसा आहे. त्‍यानंतर पावसामुळे पाणीपातळीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. सध्या तरी पाणीटंचाई नाही. मात्र, तरीही नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.
- रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवन धरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT