पिंपरी-चिंचवड

महापालिकेचे अधिकारी निवडणूक कामातून मुक्‍त

CD

पिंपरी, ता. २१ : मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्‍या निवडणूक कामातून महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी कार्यमुक्‍त करण्यात आले आहेत. सोमवारी (ता. २१) त्‍याबाबतची कार्यवाही करण्यात आली आहे. त्‍यामुळे लवकरच हे अधिकारी कामावर रुजू होतील. त्‍यामुळे महापालिकेचे कामकाज पुन्‍हा सुरळीत होणार आहे.
मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच झाली. निवडणुकीच्‍या कामकाजासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले होते. त्‍यामुळे महापालिकेत शुकशुकाट होता. नागरिकांची कामे अधिकाऱ्याविना खोळंबली होती. मात्र, आता या कामांना पुन्‍हा गती येणार आहे. महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गजबजणार आहे. कारण निवडणुकीच्‍या कामकाजातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यमुक्‍त करण्यात आले आहे. १३ मे रोजी मतदान प्रक्रिया झाली. मावळ लोकसभाअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यालयाकडून १४ मे रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयक कामातून कार्यमुक्त करण्यात आले. तर, पिंपरी विधानसभा मतदारसंघ कार्यालयाकडून १२० जणांना १७ मे रोजी कार्यमुक्त केले. तर, सोमवारी (ता. २०) ५० जणांना कार्यमुक्त केले आहे. तसेच शिरूर लोकसभाअंतर्गत भोसरी विधानसभा मतदारसंघ कार्यालयासाठी कार्यरत असलेल्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना १५ मे रोजी निवडणूक विषयक कामातून कार्यमुक्त केले आहे. मतमोजणीसाठी काही अधिकारी नियुक्त केले आहेत. मतमोजणी दिवशी हे अधिकारी कर्मचारी त्‍या ठिकाणी कार्यरत असतील. मतमोजणीसाठी आवश्यकतेनुसार नव्या नियुक्ती केल्या जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Qualifier 1 : चौकार गेला, हातातून बॅट सटकली अन् साई सुदर्शनचा 'गेम'झाला... IPL मधील सर्वात विचित्र विकेट Video

Gold Loan Fraud: बनावट सोन्याने १८ लाखांचा घोटाळा; एचडीएफसी बँकेच्या गोल्ड लोन व्हॅल्युअरसह १२ जणांवर गुन्हा

Sakal Vidya Education Expo : करिअरच्या वाटा; ३०, ३१ मे रोजी भेटा; काळेवाडीत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’

अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये शिरला बिबट; चार तासांनंतर वनविभागाने घेतले ताब्यात, नागरिकांची मोठी गर्दी

Music Composer Harsh Raut : लोकसंगीत कॉन्सर्टद्वारे उंचीवर नेण्याचा प्रयत्न; मोशीत शुक्रवारी ‘द फोक आख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन

SCROLL FOR NEXT