पिंपरी-चिंचवड

गर्भवतींनी घ्या, आरोग्याची काळजी

CD

पिंपरी, ता. २१ ः मातामृत्यूचे जगभरातील वाढते प्रमाण हा सध्या चिंतेचा विषय मानला जातो. मातामृत्यू होण्यामागील सर्वांत मोठे कारण म्हणजे ‘प्री-एक्लेम्पसिया’ हे आहे. या आजाराकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर एक्लेम्पसिया उद्‍भवतो. त्यामुळे गर्भवतींना अथवा बाळंतीनीला अपस्मारासारखे झटके येतात. त्यातून मृत्यूही उद्‍भवू शकतो. मात्र, प्री-एक्लेम्पसियाकडे वेळीच लक्ष दिले तर तो बराही होऊ शकतो. त्यासाठी वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.

रक्तदाबाकडे लक्ष देणे आवश्‍यक
गर्भारपणात होणारा उच्चरक्तदाब हे प्री-एक्लेम्पसिया होण्यामागील मुख्य कारण आहे. गर्भवतीच्या पायावर सूज येणे, सतत लघवीला जाणे, जास्त उलट्या होणे ही देखील या आजाराची लक्षणे आहेत. या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर हा आजार एक्लेम्पसियामध्ये परावर्तित होतो. त्यातून गर्भवती व तिचे बाळ यांनाही धोका निर्माण होतो. त्यामुळे गर्भारपणात उच्च रक्तदाब होऊ नये याकडे गर्भवतींनी लक्ष देणे गरजेचे आहे. गर्भवती असताना वारंवार रक्तदाबाची तपासणी करणे, आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे ही पथ्ये पाळल्यास या आजाराचा धोका कमी होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.

आजाराचा प्रवास खेड्याकडून शहराकडे
वैद्यकीय सुविधांचा अभाव, गरोदरपणातील आहाराबाबतचे अज्ञान यामुळे खेड्यातील महिलांमध्ये प्री-एक्लेम्पसिया हा आजार आढळून येत असे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हा आजार शहरातील गर्भवतींमध्येही हा आजार आढळून येत आहे. शहरी भागातील महिलांची बदललेली जीवनशैली, ताण, व्यसनाधिनता यामुळे हा आजार उद्‍भवत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

आजाराची कारणे
- गर्भवती महिलांमध्ये वाढलेला रक्तदाब
- बदललेली जीवनशैली व त्यामुळे वाढलेला ताण
- महिलांमध्ये वाढलेले मद्यपान व धूम्रपानाचे प्रमाण
- नोकरी करणाऱ्या महिलांचे कामाचे वाढलेले तास
- महिलांमध्ये वाढलेला लठ्ठपणा

काय करावे
- वेळोवेळी रक्तदाब तपासून घ्यावा
- उच्च रक्तदाब असल्यास मीठ खाणे बंद करावे
- घरातील वातावरण तणावमुक्त ठेवावे
- गर्भवती महिलेने टीव्ही अथवा मोबाईलवर भीतीदायक बाबी पाहू नये
- गर्भवतीने आहार समतोल आहार ठेवावा

‘गर्भवती असताना शरीरात तयार होणाऱ्या हार्मोन्समुळे काही महिलांमध्ये रक्तदाब वाढतो. हा उच्चरक्तदाब वेळीच लक्षात आला तर योग्य उपचारांव्दारे प्री-एक्लेम्पसियामुळे होणारे दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात. काही महिलांना आधीच रक्तदाबाचा त्रास असतो. अशा महिलांनी योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे. सोसायटीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दरवर्षी जगभरात ५५ हजार माता व पाच लाख बालके प्री-एक्लेम्पसियामुळे दगावतात. त्यामुळे गर्भवतींनी जागरूक राहणे आवश्‍यक आहे.’
- डॉ. मंदार रानडे, स्त्रीरोगतज्ज्ञ व लेप्रोस्कोपिक सर्जन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT