पिंपरी-चिंचवड

कुरिअर बॉयला मारहाण; दोघांना अटक

CD

पिंपरी, ता. २१ : कुरिअर बॉयला मारहाण करून पार्सलमधील एअर गण हिसकावून पळून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. हा प्रकार वाकड येथे घडला. रवींद्र तुकाराम ताठे (रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अक्षय ऊर्फ बाळा लहू शिंदे (वय ३०, रा. माउली चौक, वाकड) व प्रशांत चव्हाण (वय ४०, रा. उत्कर्ष चौक, वाकड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी काम करीत असलेल्या स्टोअरचा कुरिअर बॉय अमित कुमार यादव हा कुरियरचे पार्सल घेऊन जाण्यासाठी आला असता, आरोपींनी अमित यास दमदाटी केली. तसेच फिर्यादी व त्यांच्यासोबतचे पवन गाडे यास दमदाटी केली. कुरिअर बॉयला दिलेले पार्सल धमकी देऊन मारहाण करून फोडले. त्यातील एअर गण जबरदस्तीने हिसकावून घेऊन आरोपींनी पळ काढला. त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या सोबतच्या नागरिकांनी पाठलाग केला परंतु आरोपी पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
पिंपरी : बस थांब्याजवळ मुलाची वाट पाहत थांबलेल्या सुजाता सुरेश किंद्रे (रा. संत तुकारामनगर, पिंपरी) या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. ही घटना वल्लभनगर येथील बीआरटी बस थांब्याजवळ घडली. किंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या बस थांब्याजवळ थांबलेल्या असताना दुचाकीवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने ओढली असता फिर्यादी यांनी हाताने सोनसाखळी पकडली. तरीही चोरट्यांनी हिसका मारून ७५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पसार झाले.

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
मोशी : भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत राजू लियाकत अली बिश्वास (वय २६) या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मोशी प्राधिकरणातील आरटीओ लिंक रोड येथे घडली. याप्रकरणी जहांगीर लियाकत अली बिश्वास (रा. पवारनगर, थेरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दत्तात्रेय भाऊराव जगदाळे (वय ५८, रा. अलंकापुरम फेज तीन, वडमुखवाडी, चऱ्होली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचे भाऊ राजू हे त्यांच्या दुचाकीवरून मोशीकडून आरटीओ लिंक रोडकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना आरोपीने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने राजू यांचा मृत्यू झाला.

मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा
चिंचवड : दोघा भावंडांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे घडली. याप्रकरणी ऋषिकेश सुभाषराव डोंगरे (रा. वाल्हेकर चाळ, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार यशराज विजय काळभोर (वय २५, रा. निगडी, गावठाण) व कुणाल प्रदीप वराडे (वय २४, रा. गुरुद्वारा चौकाजवळ, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचा लहान भाऊ संघर्ष डोंगरे हा फोनवर बोलत असताना आरोपींनी काहीही कारण नसताना फिर्यादीच्या भावाला मारहाण केली. दरम्यान, तुम्ही माझ्या भावाला का मारता? अशी फिर्यादीने विचारणा केली असता, आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या भावाला शिवीगाळ व मारहाण केली. आरोपी यशराज याने गाडीची चावी फिर्यादीच्या डोक्यात व चेहऱ्यावर मारून त्यांना जखमी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉकड्रिलवेळी हातात फुटलं ग्रेनेड, ४ पोलीस गंभीर जखमी; अहिल्यानगरमध्ये दुर्घटना

जास्त भावुक नका होऊ! कॉकरोच जनता पार्टीविरोधात याचिका, सरन्यायाधीश काय म्हणाले?

Share Market: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे शेअर बाजारातील या 3 शेअरमध्ये मोठी तेजी!

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात पेट्रोल चोरांचा धुमाकूळ; राजारामपुरीतील रहिवासी त्रस्त

Electricity Bill Reducing Tips : उन्हाळ्यात लाईट बिल प्रचंड वाढवतात 'ही' 3 छोटी उपकरणे, आजच वापर करा कमी

SCROLL FOR NEXT