पिंपरी-चिंचवड

सलग दुसऱ्या दिवशीही अनधिकृत होर्डिंगवर कारवाई

CD

पिंपरी, ता. २१ : महापालिकेच्‍या वतीने सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत होर्डिंगवरील कारवाई सुरूच ठेवली. मंगळवारी चिंचवड, रावेत, चिखली आणि किवळे परिसरात ही कारवाई करण्यात आली. यात चार होर्डिंग महापालिकेने काढले. तर अन्य भागात नऊ अनधिकृत होर्डिंग मालकांनी स्‍वतः काढून घेतल्याची माहिती महापालिकेच्‍या वतीने देण्यात आली.
आयुक्‍त शेखर सिंह यांनी दिलेल्‍या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. सहआयुक्‍त चंद्रकांत इंदलकर, उपायुक्‍त संदीप खोत, परवाना निरीक्षक, मजूर, एमएसएफ जवान, महापालिका सुरक्षारक्षक आणि कर्मचारी यात सहभागी झाले होते. सोमवारी पहिल्‍याच दिवशी पाच होर्डिंगवर हातोडा घातला. मंगळवारी (ता. २१) चार होर्डिंग जमीनदोस्त केले. यात कातळेवस्ती रावेत, किवळे येथील ३० फूट उंच आणि २० फूट रुंदीचा फलक, कातळेवस्ती रावेत येथील ३० फूट उंच आणि २० फूट रुंदीचा फलक. भोईर उड्डाण पुलाजवळ चिंचवड येथील ३० फूट उंच आणि ३० फूट रुंदीचा फलक, चिखली येथील २० फूट उंच आणि २० फूट रुंदीचा फलक असे मिळून चार होर्डिंग हटविण्यात आले.

नऊ ठिकाणचे होर्डिंग काढले
या कारवाईत नऊ अनधिकृत होर्डिंगधारकांनी स्‍वतः ते काढून घेतले. यामध्ये ४० फूट उंच आणि १० फूट रुंदीचा एक, १५ फूट उंच आणि १५ फूट रुंदीचा एक, १० फूट उंच आणि १० फूट रुंदीचा एक होर्डिंग हटविले. तर ३० फूट उंच आणि २० फूट रुंदीचे दोन होर्डिंग तर २० फूट उंच आणि २० फूट उंचीचे तीन आणि म्‍हाडा येथील एक होर्डिंग होर्डिंगधारकांनी स्‍वतःच हटविले. नवीन भक्ती शक्ती मुकाई चौक रस्ता, शनी मंदिर रोड वाकड, बापूजी बुवानगर मुंबई- बंगळूर महामार्गावर साई पेट्रोल पंप, भक्ती शक्ती चौक निगडी, यश साने पेट्रोल पंप चिखली, शेलार वस्ती देहू आळंदी रोड तळवडे, सोनवणे वस्ती चिखली, मंगलनगर आयवाना बिल्डिंग थेरगाव, म्‍हाडा प्रकल्‍प पुणे-मुंबई ताथवडे आदी ठिकाणी हे नऊ होर्डिंग लावलेले होते.

रेल्‍वे तसेच पीएमपीएमएल हद्दीतही कारवाई करणार
रेल्वे तसेच पीएमपीएमएल हद्दीतील अनधिकृत जाहिरात फलकांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेने त्‍याची कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी रेल्वेच्या तसेच पीएमपीएमएलच्या जागेवर असलेले फलक शासन धोरणातील तरतुदीनुसार उभारले नसल्यास संरचनात्मक लेखापरीक्षण होणार आहे. यामध्ये अनधिकृत असलेले जाहिरात फलक किंवा होर्डिंग काढण्याबाबत संबंधित प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्‍याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

महापालिकेच्‍या वतीने मंगळवारी अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरूच ठेवली आहे. दिवसभरात चार होर्डिंग महापालिकेच्‍या वतीने काढण्यात आले. नऊ होर्डिंग नागरिकांनी स्‍वतःच काढले होते. चिंचवड, रावेत, किवळे आणि चिखली भागात ही कारवाई केली.
- संदीप खोत, उपायुक्‍त, आकाशचिन्‍ह व परवाना विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT