पिंपरी-चिंचवड

देहूफाट्या जवळ लष्कराच्या नाका उभारणीला ग्रामस्थांचा विरोध

CD

लष्कराच्या नाका उभारणीला विरोध

देहू संस्थान, परिसरातील ग्रामस्थातर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

देहू, ता. २१ : पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील देहूफाटाजवळील प्रवेशद्वार कमानीजवळ लष्कराच्या वतीने वाहनांना रोखण्यासाठी मंगळवारी (ता.२१) नाका उभारण्यात येत होता. या नाका उभारण्याला संत तुकाराम महाराज संस्थान, चिंचोली येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ आणि वाहतूक संघटनांनी विरोध केला आहे. नाका उभारून वाहतुकीला मज्जाव करू नये, असे निवेदन हवेलीचे प्रांताधिकारी, पिंपरी चिंचवडचे अप्पर तहसिलदार आणि देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांनी देहू येथे दिले.
पुणे-मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राकडून येणारी वाहने या रस्त्याचा वापर करतात. तसेच चाकण, महाळुंगे तळेगाव एमआयडीतील वाहने याच मार्गाने जातात. दररोज देहूत दर्शनासाठी हजारो भाविक दररोज येत आहेत. या मार्गावरील वाहतूक रोखण्यासाठी लष्कराच्या वतीने देहूफाटा येथे नऊ आणि सोळा फुटी उंच नाका उभारण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात स्थानिक आणि इतर अवजड वाहने, भाविकांच्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही, अशी स्थानिक नागरिकांना भीती आहे. दररोज लष्कराचे जवान स्थानिक वाहने सकाळी आणि संध्याकाळी सोडण्यास मज्जाव करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
लष्कराच्या वतीने देहूफाटा येथे उभारण्यात येत असलेल्या नाक्याचे काम नागरिकांनी रोखले. हवेलीचे प्रांताधिकारी संजय असवले देहूत पालखी सोहळ्याचे नियोजनासाठी आले होते. त्यावेळी त्यांना निवेदन दिले. प्रांताधिकारी संजय असवले यांनी संबंधित नाक्याची देहूफाटा येथे पाहणी केली. लष्कराचे अधिकारी आणि कॅटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन पालखी सोहळ्यातील भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी मार्ग काढण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
चिंचोली येथील नागरिक आणि देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष राहूल बालघरे म्हणाले, ‘‘लष्कराच्या वतीने पालखी मार्गावर वाहने रोखण्यात येतात. आता नाका उभारला तर स्थानिक नागरिकांचे व्यावसायिक ट्रक, दूध वाहतूक करणारी वाहने यांना मज्जाव येईल.

‘‘देहू ते देहूरोड हा पालखी मार्ग आहे. तो अरुंद आहे. येथे दहा गावांतील स्थानिक नागरिक हा रस्ता वापरतात. एमआयडीसी आणि हजारो भाविकांचा हा मार्ग आहे. लष्कराने पालखी मार्गाचे रुंदीकरणास परवानगी देणे गरजेचे आहे. मात्र, वाहतुकीस अडथळा होईल, यासाठी नाका उभारू नये.’’
- माणिक महाराज मोरे, सोहळाप्रमुख, संत तुकाराम महाराज संस्थान

देहूरोड : पुणे-मुंबई महामार्गावरील देहूफाटा येथे लष्कराच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या नाक्याची पाहणी हवेली प्रांताधिकारी संजय असवले, अप्पर तहसिलदार जयराज देशमुख यांनी मंगळवारी पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT