पिंपरी-चिंचवड

नितीनमहाराज मोरे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर भिकू वाघेरे पाटील यांच्या स्मृतीदिनी वितरण

CD

पिंपरी, ता. १ ः दिवंगत महापौर भिकू वाघेरे पाटील यांच्या ३८ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी (ता. ६)विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पिंपरी वाघेरे येथील नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे देहू गाव येथील नितीन महाराज मोरे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी (ता. १) पत्रकार परिषदेत दिली.
मोरवाडी, पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब वाघेरे, जयवंत शिंदे, रमेश गोलांडे, अण्णा कापसे, सुरेश झिटे, गणेश वाघेरे, किसन (अप्पा) वाघेरे, बिपिन नानेकर, निशाण गवळी, विलास भोंडवे, प्रशांत खुळे, संजय लंके यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
वाघेरे पाटील म्हणाले, ‘‘दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जाते. यंदाही विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. नवमहाराष्ट्र विद्यालय येथील भिकू वाघेरे यांच्या पुतळ्यास सकाळी नऊला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी साडेनऊला रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT