पिंपरी-चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये वृक्षतोडप्रकरणी कारवाईकडे दुर्लक्ष

CD

पिंपरी, ता. २ : पिंपळे सौदागर येथील लक्षद्वीप सोसायटीमध्ये वृक्षतोड होऊनही महापालिकेने कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. नोटिस देऊन सहा महिने झाले. पुढील कारवाई अद्याप झाली नसल्‍याची तक्रार स्‍थानिक रहिवासी यश चौधरी यांनी केली आहे. तर वृक्षतोडीचा अहवाल तयार करण्यात आला असून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उद्यान विभागाच्‍या वतीने देण्यात आली.
पिंपळे सौदागर येथील लक्षद्वीप सोसायटीमध्ये जांभळाचे वृक्ष उद्यान विभागाची परवानगी न घेता तोडण्यात आल्‍याची तक्रार यश चौधरी यांनी दिली होती. त्‍यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या उद्यान विभागाच्‍यावतीने पंचनामा करण्यात आला. वृक्षतोड झाल्‍याचे आढळून आले. त्‍यानंतर, सोसायटीला नोटिस बजावून सविस्‍तर लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. या प्रक्रियेला सहा महिन्‍यांचा कालावधी झाल्‍याचे यश चौधरी यांनी सांगितले. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. जांभळाचे झाड पाडल्‍याबाबत सोसायटीतील सर्व सभासदांच्‍या सह्यांसह अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्‍यामध्ये ते झाड नैसर्गिकरित्‍या पडले असल्‍याचे पत्रात नमूद केले असल्‍याची माहिती सोसायटी सभासदांनी दिली.


सोसायटीमधील वृक्षतोडीची तक्रार प्राप्‍त झाली आहे. त्‍यानुसार, आम्‍ही सोसायटीला नोटिस बजावली आहे. त्‍यांच्‍याकडून समाधानकारक खुलासा न आल्‍यास कारवाई केली जाईल.
- अनिल गायकवाड, उद्यान निरीक्षक, पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात १७ वर्षांच्या मुलाची हत्या, पोलिसांनी भर पावसात काढली गुन्हेगारांची धिंड; मृताच्या आईने आरोपींना सर्वांसमोर चपलेने मारले

IND vs ZIM 1st T20I: भारतीय संघात पदार्पणासाठी ४ युवा खेळाडूंमध्ये स्पर्धा; वैभव सूर्यवंशीसारखा आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज आघाडीवर, कशी असेल Playing XI?

Live Updates Marathi : संसद भवन परिसरात विरोधकांचे आंदोलन

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांचे टेन्शन वाढले! सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; चांदीही चमकली, पाहा ताजे भाव

जय-शरूमध्ये फुलणार प्रेमाचा बहर, 'सनई चौघडे' मालिकेतील प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, 'दोघांची केमिस्ट्री...'

SCROLL FOR NEXT