पिंपरी-चिंचवड

पोलिस आयुक्तांकडून तक्रारींचे निवारण

CD

पिंपरी, ता. २ : पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी चिखली पोलिस ठाण्याला भेट देऊन शनिवारी (ता.१) स्वतः तक्रारींचा आढावा घेतला. तसेच त्यांनी तक्रारदारांच्या तक्रारींचे निवारण केले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत सर्व पोलिस ठाण्यांत एकूण ३६५ तक्रार अर्ज मार्गी लावण्यात आले.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत सर्व पोलिस ठाण्यात शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. चिखली पोलिस ठाणे येथे जाऊन पोलिस आयुक्त चौबे यांनी तक्रार निवारण दिनाचा आढावा घेतला. पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यावेळी उपस्थित होते.
नागरिकांशी थेट संवाद साधता यावा आणि तक्रारदारांची गैरसोय न होता त्यांच्या तक्रारींचे निरसन व्हावे, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात दर शनिवारी सकाळी साडेदहा ते दुपारी दोन यावेळेत या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार, शनिवारी पोलिस उपायुक्त व सहायक पोलिस आयुक्त यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात ६७९ अर्जदारांनी उपस्थिती दर्शविली. त्यांचे म्हणणे ऐकून घेत अधिकाऱ्यांकडून तक्रारींचे निवारण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8 वर्षापूर्वीच CM होणार हे विजयला माहित होतं? थलापतीच्या विजयानंतर गाडीची नंबरप्लेट व्हायरल

रोहितचे 'ते' फटके मी फक्त स्वप्नातच मारू शकतो!" मुंबईच्या सलामीवीरा रायन रिकल्टनच मोठ विधान पाहा नेमकं काय म्हणाला?

IndiGo विमानात पॉवर बँकचा ब्लास्ट! तुम्हीसुद्धा पॉवर बँक वापरत असाल तर अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर जीवावर बेतेल

Radha Patil Dance Show Fight : पंढरपुरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; कार्यक्रम अर्धवट सोडण्याची वेळ, व्हिडिओ व्हायरल

Vande Mataram Equal Status : बंगालमधील विजयानंतर मोदी सरकारचा मोठा निर्णय! 'वंदे मातरम'ला आता राष्ट्रगीताचा दर्जा; अपमान केल्यास थेट तुरुंगवास

SCROLL FOR NEXT