पिंपरी-चिंचवड

दोन दिवस पाण्याविना तळेगावात नागरिकांचे हाल

CD

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ३ : येथील मारुती मंदिर चौकाच्या वळणावर सोमवारी (ता.३) भूमिगत जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे ओंकार सोसायटी, विद्या कॉलनी येथील नागरिकांना दोन दिवस पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे, त्यांचे हाल झाले.
केबलसाठी रस्त्याची खोदाई चालू असताना जलवाहिनी फुटल्याचे समोर आले आहे. त्याने पाणीपुरवठा खंडित झाला. ओंकार सोसायटी, विद्या कॉलनीमधील नागरिकांना जादा पैसे मोजून पाण्याचा टँकर मागवावा लागले. नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने येथील फुटलेल्या जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी पसरल्याने दुचाकी घसरून पडण्याच्या घटना घडल्या. तेथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे ओंकार सोसायटी, विद्या कॉलनी मधील नागरिकांचे दोन दिवसांपासून पाण्याविना हाल झाले. पाण्याचे टँकर मागवावे लागले.
- बबलू बेंजामिन, रहिवासी, ओंकार सोसायटी

मागील एक महिन्यापूर्वी जलवाहिनीची दुरुस्ती केली होती. जेसीबीच्या साहाय्याने केबलसाठी खोदाई करताना जलवाहिनी फुटली.
- आर.एन.जाधव, पाणीपुरवठा कर्मचारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद
PNE24U23660

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT