पिंपरी-चिंचवड

ऑनलाइन फसवणूकप्रकरणी राजस्थानमधून एकाला अटक

CD

पिंपरी, ता. ३ : ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीस पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलच्या पथकाने राजस्थान येथून अटक केली.
महम्मद जुबेर जावेद चव्हाण (वय २१, रा. फत्तेपूर, जि. सीकर, राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. बावधन येथील महिलेला गुगल रेटिंग टास्क देवून पूर्ण केल्यास अधिक रक्कम देण्याचे आमिष दाखवले. आरोपीच्या खात्यात रक्कम भरण्यास प्रवृत्त करून, महिलेकडून दोन लाख ४५ हजार रुपये घेऊन ऑनलाइन फसवणूक केली. याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत तपास सायबर सेल करीत असताना फिर्यादीने पैसे पाठविलेल्या अकाउंटला तीन लाख रुपये ट्रान्स्फर झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अकाउंटधारकाचा शोध घेतला असता, ही रक्कम चव्हाण याला पाठवल्याचे समोर आले. तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे चव्हाण याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने सायबर सेलच्या पथकाने तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून आरोपीला राजस्थान येथून ताब्यात घेतले. दरम्यान, चव्हाण हा दुबई येथील व्यक्तीस बनावट अकाउंट द्यायचा तसेच त्याने अनेक जणांची फसवणूक केल्याचेही तपासात समोर येत आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT