पिंपरी-चिंचवड

व्हेरॉक-वेंगसरकर संघाला अजिंक्यपद

CD

पिंपरी, ता. ३ ः व्हेरॉक करंडक (उन्हाळी) क्रिकेट स्पर्धेत ११ वर्षांखालील मुलांमध्ये यजमान व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीच्या संघाने ५९ धावांनी विजय मिळवत जेतेपद पटकाविले. विजयी संघाचा गोलंदाज दर्श चनपूर सामनावीर ठरला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजीव कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्यासह अकादमीचे प्रशिक्षक शादाब शेख, भूषण सूर्यवंशी, चंदन गंगावणे, राहुल वेंगसरकर हे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना वेंगसरकर यांनी तंत्रकौशल्य विकसित करण्याबरोबरच तंदुरुस्ती वाढविण्यासाठी परिपूर्ण व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे देखील अत्यंत गरजेचे असल्याचे नमूद केले. डॉ. विजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
सर्वोत्तम गोलंदाज म्हणून दर्श चनपूर, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून रायन पानसकर (दोघेही व्हेरॉक-वेंगसरकर) स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज आणि सर्वोत्तम मानकरी खेळाडू म्हणून वीरेन आटोळे (एच.के. बाऊन्स) यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक ः
अंतिम सामना ः व्हेरॉक-वेंगसरकर ः २० षटकांत ८ बाद १३० - अद्विका जाधव ४४, अर्जुन शेटे २४ (शंभूराज निंबाळकर २/२१, ऋषिकेश देशमुख २/१३) वि.वि.एच.के.बाऊन्स ः २० षटकांत ७ बाद ७१ - वीरेन आटोळे ३४ (दर्श चनपूर ३/१०, शौर्य कांबळे २/२०);
पहिला उपांत्य सामना ः विराग ः २० षटकांत ७ बाद ७९ - विहान सुतार ४१ (वीरेन आटोळे ३/९) पराभूत वि.एच.के.बाऊन्स ः ११.३ षटकांत ४ बाद ८२ - वीरेन आटोळे ४४ (रयान ३/११);
आर्यन्स ः २० षटकांत ७ बाद १०३ - सार्थ बडदे ४७ (३/२५) पराभूत वि.व्हेरॉक-वेंगसरकर ः १४.३ षटकांत २ बाद १०४ - अद्विका जाधव ४६, सुधाकर राठोड ३७
PNE24U23801

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Chaitra Yatra 2026 : कामदा एकादशीच्या मुहूर्तावर चैत्र यात्रा सुरू; गुलाल-खोबऱ्याची उधळण, सीमाभागासह राज्यभरातील भाविक दाखल

UP industry Policy: UP मध्ये आता लायसन्स राज संपणार! छोट्या उद्योगांना योगी सरकारची मोठी भेट; 'या' सुविधेमुळे ५ वर्षे तपासणीतून मुक्ती

IPL 2026 CSK vs RR : MS Dhoni च्या जागी कुणाला मिळणार Playing XI मध्ये संधी? 'या' २० वर्षीय खेळाडूचं नाव चर्चेत...

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं-चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

SCROLL FOR NEXT