पिंपरी-चिंचवड

कुदळवाडीतील आगीत चार कारखाने खाक

CD

चिखली, ता.६ : कुदळवाडी येथील पवारवस्ती परिसरात गुरुवारी (ता.६) सकाळी लागलेल्या आगीत रबर मोल्डिंगचे चार कारखाने जळून खाक झाले. सकाळी आठ वाजता लागलेली आग अग्निशामक दलाच्या आठ बंबांच्या साहाय्याने दुपारी दीड वाजता नियंत्रणात आली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचे स्थानिक नागरिक सांगत असले तरीही आगीचे नेमके अधिकृत कारण कळू शकले नाही.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुदळवाडी येथील पवार वस्ती परिसरात गुरुवारी सकाळी आठ वाजता रबराचा कारखाना आणि गोदाम असलेल्या कारखान्याला अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच हाकेच्या अंतरावर असलेल्या चिखली येथील अग्निशामक केंद्रातील बंब घटनास्थळी झाला मात्र, रबर मोल्डिंगचा कारखाना आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साठवण्यात आलेले रबर यामुळे आगीने लगेच भडका घेतला. एका कंपनीत लागलेली आग शेजारील दुसऱ्या कंपनी आणि गोदामाकडे सरकण्यास सुरूवात झाली. आगीची तीव्रता लक्षात घेता आणि शेजारील मोठ्या प्रमाणात असलेली गोदामे आणि कंपन्यांपर्यंत त्याची तीव्रता वाढत जाईल आणि संपूर्ण परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल, असे लक्षात आल्याने अग्निशामक अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक विभागाचे सहा बंब आणि खासगी कंपनीचे दोन बंब घटनास्थळी बोलावले. आठ अग्निशामक बंब आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या टँकरच्या साहाय्याने दुपारी दीड वाजेपर्यंत आग नियंत्रणात आणण्यात आली.

सर्वांच्या प्रयत्नांमधून आगीवर नियंत्रण
अग्निशामक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबरच पोलिस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केल्याने आग लवकर आटोक्यात आणण्यात यश आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. आग नियंत्रणात आली असली तरीही रबराच्या ढिगाऱ्यामुळे ती धुमसत असल्याचे पहावयास मिळाले.
PNE24U24331

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS: पाकची उडाली झोप! 'ब्रिक्स'च्या घोषणापत्रात दहशतवादावर सडकून टीका; पहलगाम हल्ल्याचा उल्लेख

बाळाच्या संगोपनासाठी घरात आली मंगल; पण नंतर बदललं सगळंच! ‘अडकित्ता’मध्ये नेमकं काय घडलं? वाचा रिव्ह्यू

Pune Road Inspection: गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात रस्ते दुरुस्तीचा बोजवारा; मिरवणूक मार्गांवर खड्डे, धोकादायक चेंबर अन् फुटपाथ

Palghar Bus Tragedy: शिवशाही बसच्या डिकीचे झाकण उघडताच शेतकरी सुभाष पागींचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत गर्दी

SCROLL FOR NEXT