पिंपरी-चिंचवड

पर्यावरणदिनानिमित्त चिंचवडमध्ये वृक्षारोपण

CD

पिंपरी, ता. ६ ः आनंद ज्येष्ठ नागरिक संघ आणि गोलांडे इस्टेट मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, चिंचवड येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पारंपरिक पद्धतीने पूजनाद्वारे वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते विश्वास साळुंखे, सेवानिवृत्त महापालिका नगररचना उपसंचालक प्रभाकर नाळे, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, कार्याध्यक्ष प्रिया जोशी, खजिनदार रवींद्र झेंडे, गोलांडे इस्टेट मित्र मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे उपस्थित होते.
वृक्षसंवर्धनामुळे आत्मिक आनंद मिळत असल्याचे मत साळुंखे यांनी यावेळी व्यक्त केले. गोलांडे यांनी सुमारे तेरा वर्षांपासून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परिसरात वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे नमूद केले. तर नाळे यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत ‘थिंक ग्लोबली ॲण्ड ॲक्ट लोकली’ या उक्तीनुसार आपण काम करूया, असे आवाहन केले.
प्रदीप वळसंगकर, नृसिंह पाडुळकर, सूर्यकांत क्षत्रिय, माधव जोशी, सुनंदा माटे, प्रेमलता कलाल, पूनम गुजर, सरिता पाळंदे, अश्विनी कोटस्थाने, प्रभाकर काढे, शिवाजी कांबळे, श्याम ब्रह्मे, सरिता कुलकर्णी, शुभांगी भिडे, दीक्षान्त रणधीर यांनी संयोजनात सहकार्य केले. रवींद्र झेंडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur Highway Accident : टायर फुटून क्रूझर थेट ट्रकवर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू; गाडीचा चुराडा

Latest Marathi News Live Update : मुंबईत एसीबीची मोठी कारवाई! सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडलं

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

Google चा मोठा खुलासा! Zero Day मुळे धोक्यात आलेत 3.5 अब्ज क्रोम वापरकर्ते; आत्ताच 'हा' एक बदल नाही केला तर डेटा होऊ शकतो गायब

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

SCROLL FOR NEXT