पिंपरी-चिंचवड

विनापरवानगी रस्ते खोदाई; कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल महापालिकेची कारवाई; दोन कोटी नुकसानीचा आरोप

CD

पिंपरी, ता. ६ : वेगवेगळ्या कामांच्या नावाखाली रस्ते खोदाई केली जाते. यामध्ये चांगल्या रस्त्याची अक्षरशः वाट लागते. खोदलेले रस्ते पुन्हा व्यवस्थित दुरुस्त न करता तसेच सोडले जातात. यामुळे अपघाताच्या घटनांसह वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. अनेकदा महापालिकेची परवानगी न घेताच रस्ते खोदाईचे उद्योग सुरू असतात. असे प्रकार रोखण्यासाठी आता महापालिकेनेही कारवाईचा बडगा उगारला आहे. विना परवानगी रस्ते खोदाई केल्याप्रकरणी भोसरीत एका कंपनीवर गुन्हा दाखल केला असून दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप महापालिकेने केला आहे.
महापालिकेचे अभियंता सुनील ज्ञानदेव दांगडे (रा. शिवाजीनगर, चिखली, प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मे. देविका इलेक्ट्रिक कंपनीतर्फे काम करणारे पांडुरंग जोगदंड (रा. बालेवाडी, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या एमआयडीसी भोसरी परिसरातील थरमॅक्स कंपनीपासून खिरारोडपर्यंत आणि तेथून अंतर्गत रस्त्याने जुन्या फिलिप्स कंपनीपर्यंत, तसेच राज्य महामंडळ प्रशिक्षण केंद्रापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर एक हजार ५८० मीटर अंतरावर खोदकाम केले आहे. यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार परवानगी न घेता महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे अंदाजे दोन कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी जोगदंड विरुद्ध सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियमांतर्गत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांचे असभ्य चित्रण खपवून घेतले जाणार नाही! अश्लील जाहिरातींवर सरकारचा मोठा निर्णय; तज्ज्ञ समिती स्थापन होणार

Beed: सरपंचपदासाठी कायपण? मराठा असूनही मिळवले पारधी जातीचे प्रमाणपत्र, पडताळणी समितीनं ठरवलं रद्द

Marathi Live Updates : मोठी दुर्घटना थोडक्यात टळली! वसईत जोरदार वाऱ्याने होर्डिंगचे तुकडे कोसळले

Chhatrapati Sambhinagar: जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुतीची सरशी; कॉंग्रेसचे एकमेव खा. डॉ. कल्याण काळे यांचा ४८ मतांनी विजय

"ट्रम्पला ठार मारणे हे आपले कर्तव्य!" ; इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीवेळी चिथावणीखोर घोषणाबाजी, मोठ्या प्रमाणात गर्दी

SCROLL FOR NEXT