पिंपरी-चिंचवड

आलीऽऽ आलीऽऽऽ डोंगरची काळी मैऽऽना.... रानमेवा खरेदीसाठी अबालवृद्धांची गर्दी ः विक्रेत्यांचीही लगबग

CD

पिंपरी, ता. ७ ः ‘डोंगरची काळी मैना’ म्हणून सर्वदूर परिचित असणारी करवंदं सध्या बाजारात दाखल झाली आहेत. ‘करवंदं घ्या, करवंदं’च्या आरोळ्यांनी शहरातील पिंपरी कॅंम्प बाजारपेठ आणि काळेवाडी परिसर घुमून जात आहे. हा रानमेवा खरेदी करण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी होत आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून करवंदं आणि जांभळे विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या विक्रेत्यांची लगबग
पहायला मिळतेय.
किरकोळ विक्रेत्यांना महिनाभर का होईना, करवंद, जांभळातून आर्थिक मिळकत होत असते. तुटपुंज्या कमाईतूनही काही विक्रेत्यांना मिळणारे समाधान मात्र कायम असते. भुशी डॅम, लोणावळा, सासवड या भागातून जांभूळ आणि करंवदांची आवक होत आहे. शहरात सात ते आठ‎ घाऊक व्यापारी दिवसाला २०० ‎किलोपेक्षा अधिक करवंद‎ मागवतात. पाच ते सहा दिवसांपूर्वी ‎घाऊकचा दर १०० रुपये‎ होता तर किरकोळ ‎बाजारात गेल्या आठवड्यात ३०० ते ४०० रुपये किलो दराने जांभळांची विक्री होत आहे. करंवदांची २५० ते ३०० रुपये किलो विक्री होत आहे, अशी माहिती काळेवाडीतील इरफान शेख यांनी ‎सांगितले. सध्या करवंदाला‎ शहरात चांगली मागणी ‎असल्याचे विक्रेत्याने सांगितले.‎

जांभळाला पर्याय करवंद
आंब्यांचा सीझन संपल्यानंतर‎ जांभळाचे आगमन होते. ते आंब्यांवर उतारा म्हणून मधुमेही रुग्ण खातात;‎ परंतु त्यापेक्षाही गुणकारी करवंद आहे. कारण त्यात आंबट तुरट हे गुणधर्म ‎असल्याने ते मधुमेहींसाठी जांभळा एवढेच फायदेशीर आहे, असे‎ आहारतज्ज्ञ सांगतात. दरम्यान,‎ विटामिन सी, विटामिन ए असे भरपूर प्रकारचे‎ मिनरल्स करवंदातून मिळतात.

करवंद सेवनाने रक्तशुद्धी‎
करवंद हे दुर्मिळ प्रकारातील‎ बेरीवर्गीय फळ आहे. ते उच्च प्रतीचे‎ पित्तशामक आहे. उन्हाळ्यात‎ होणारा अॅसिडीटी, भूक न लागणे,‎ पचन न होणे या समस्यांवर गुणकारी‎ आहे. अॅसिडिटीचे प्रमाण उन्हाळ्यात ‎वाढत असल्याने अल्काइन म्हणून ते‎ काम करते. शरीराचे वाढलेले‎ तापमान कमी करते. पाणी पिऊन ‎कोरडेपणा जाणवतो. या ‎कोरडेपणामुळे एजिंगची समस्या‎ निर्माण होते. त्यावर करवंद मात ‎करतात. रक्तशुद्ध अँटीऑक्सिडंट,‎ ऊर्जा देण्याचे काम ते करतात.‎
- डॉ. सोनल बामणे, आहारतज्ज्ञ

२४५०३‎‎‎

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

Palghar Bribery case: पालघरमध्ये आरोग्य अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, 35 हजार स्विकारत हाेते अन् काय घडलं!

Dharshiv Hailstorm News: लातूर-धाराशिवमध्ये गारपीटीचा कहर; शेती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; अवकाळी पावसाचा तडाखा!

Malkapur Accident: कंटेनरखाली चिरडल्याने दुचाकीस्वार ठार; मलकापूरजवळ अपघात, कंटेनरच्या वेगानं हाेत्याचं नव्हतं झालं!

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

SCROLL FOR NEXT