पिंपरी-चिंचवड

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

CD

पिंपरी, ता. २ ः राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये येत्या १० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे, असे परिपत्रक राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त अश्विनी भारुड यांनी प्रसिद्ध केले आहे.
राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५वी ), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल ३० एप्रिल २०२४ रोजी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळाला भेट देऊन आपला बैठक क्रमांक टाकून निकाल पाहता येणार आहे.

नाव, आडनावाच्या दुरुस्तीसाठी मुदत
विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादींमध्ये दुरुस्तीसाठी येत्या १० मे पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाइन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

महिन्याभरात गुणपडताळणीचा निर्णय
दिलेल्या मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाइन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, असेही त्या परिपत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT