पिंपरी-चिंचवड

तरुणीवर प्राणघातक हल्ला; अभियंता अटकेत

CD

पिंपरी, ता. २ : तरुणीसह तिच्या कुटुंबीयांवर लोखंडी कटरने प्राणघातक हल्ला करणाऱ्या तरुण अभियंत्याला दिघी पोलिसांनी अटक केली. हा प्रकार डुडुळगाव येथे घडला.
कृष्णा बाळासाहेब काळे (वय २८, रा. मोहितेवाडी, शेल पिंपळगाव, ता. खेड, पुणे) असे त्या अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांची एक मुलगी कॉलेजला जात-येत असताना आरोपीने तिचा पाठलाग करून विनयभंग केला. दरम्यान, फिर्यादी व त्यांची पत्नी, तीन मुली व मुलगा हे घरी असताना आरोपी हा इमारतीच्या खालून गॅलरीकडे बघत होता म्हणून फिर्यादी व त्यांची मुलगी खाली गेले. आरोपी हा मुलीला काहीतरी करेल म्हणून त्याला पकडून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून त्याला मोटारीत घेतले. त्याला पोलिस ठाण्यात नेत असताना आरोपीने त्याच्याकडील लोखंडी कटर काढून फिर्यादीच्या मुलीवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फिर्यादीची एक मुलगी दुसऱ्या मुलीला वाचवायला गेली असता आरोपीने दुसऱ्या मुलीच्याही हातावर मारून गंभीर जखमी केले. दरम्यान, फिर्यादी त्यांच्या मुलींना वाचवायला गेले असता आरोपीने कटर फिर्यादीच्या गळ्यावर मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ते कटर फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्याला व हाताला मारून त्यांनाही जखमी केले. त्यानंतर, फिर्यादी हे आरोपीकडून कटर ताब्यात घेत असताना ते हाताला लागून फिर्यादी जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT