पिंपरी-चिंचवड

गोविंदा आला रे....

CD

गोविंदा आला रे आला....

शहरात दहीहंडीचा उत्साह; पावसाच्या सरींची साथ, लहानथोरांची गर्दी

पिंपरी,ता. २८ ः गोविंदा आला रे... गोविंदा रे गोपाळा.. गो गो गोविंदा.. मच गया शोर..अशा गाण्यांवर गोविदांनी धरलेला ठेका, पावसाच्या सरीमध्ये चिंब होऊन थरावर थर लावून दहिहंडीला सलामी देणारी गोविंदा पथके, दहीहंडी पाहण्यासाठी लहानथोरांनी लावलेली हजेरी, सेलिब्रिटींची उपस्थिती अशा वातावरणात मंगळवारी (ता.२७ ) शहरात गोपाळकाला व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान रात्री श्रीकृष्ण जन्म झाल्यानंतर मंगळवारीही भाविकांनी कृष्ण मंदिरात गर्दी केली होती. मंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये, सोसायट्या कॉलनी येथे देखील सकाळीच दहीहंडी फोडण्यात आल्या. सायंकाळी मात्र डिजेच्या तालावर नाचणारे नागरिक, सार्वजनिक दहीहंडी पाहण्यासाठी चौकाचौकात, रस्तोरस्ती झालेली गर्दी असे चित्र शहरात सगळीकडेच दिसत होते.

शिवतेजनगर येथे दहीहंडी उत्सव
शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जन्मोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आली. सोमवारी (ता.२६) मध्यरात्री शंकर महाराज चोपडे यांनी जन्मोत्सवाचे प्रवचन केले. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. महिलांनी जन्माचा पाळणा म्हणून सुंठवड्याचे वाटप करण्यात आले. मंगळवारी सकाळी शंकर महाराज चोपडे यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर गोपाळकाला करून बाळ गोपाळांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन नारायण बहिरवाडे, राजू गुणवंत, दीपक बिरादार, राजेंद्र पाटील, अंजली देव, सारिका रिकामे, क्षमा काळे, शोभा नलगे, राजेंद्र पाटील, नीलिमा भंगाळे, मीरा बिरादार, रीना शिंदे, मेघराज बागी, गीतांजली पाटील यांनी केले.

राम मंदिरात धार्मिक कार्यक्रम
पुनावळे गावातील राममंदिरामध्ये कृष्णजन्माष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. २० ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सप्ताहाची सांगता मंगळवारी (ता.२७) काल्याच्या कीर्तनाने झाली. सोमवारी मध्यरात्री महावीर महाराज सूर्यवंशी यांचे कृष्णजन्माचे कीर्तन झाले. बारा वाजता कृष्णजन्म साजरा करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी सकाळी गोविंद महाराज गोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी सामुदायिक गोपाळकाला झाला. या वेळी उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mango Price Drop : आंब्याच्या दरात घसरण! ८० हजार पेट्यांची आवक, अक्षय तृतीयेला आंबा खवय्यांची हापूस मेजवाणी

Jamakhed Crime: हॉटेलचालकासह पित्‍याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जामखेड तालुक्यातील घटना, मुलगी तीन महिन्यांची गर्भवती!

Latest Marathi News Live Update: रोहित शेट्टी फायरिंग प्रकरण चार महिन्यापासून फरार आरोपीला उत्तरप्रदेश मधून अटक

अमरावती प्रकरणात फक्त दोन मुलींचे व्हिडीओ; अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालात धक्कादायक माहिती, नवनीत राणांनाही फटकारलं...

Black Magic Scam : 'तुझ्या दीराचा आत्मा घरात आहे..'; भीती दाखवून महिलेला भारत-पाक सीमेपर्यंत नेलं, भोंदूसह पोलिस पत्नीचा अजब कारनामा, 11 लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT