पिंपरी-चिंचवड

छळाला कंटाळून विवाहितेची सहाव्या मजल्यावरून आत्महत्या

CD

पिंपरी, ता. ३ : लग्नात मानपान केला नाही, या कारणावरून विवाहितेचा पती, सासू व सासऱ्याने छळ केला. त्याला कंटाळून विवाहितेने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना ताथवडे येथील रामनगर येथे घडली.
याप्रकरणी प्रदीप नारायणराव जामीनदार (रा. तुळशीनगर, इंदोर) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार पती केशरीनंदण तेजनारायणलाल कर्ण (वय ३३), सासू शीला तेजनारायणलाल कर्ण, सासरा तेजनारायणलाल कर्ण (सर्व रा. कोहिनूर सफायर, रामनगर, ताथवडे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या तीस वर्षीय मुलीचा आरोपी केशरीनंदन याच्याशी विवाह झाला. यावेळी लग्नात मानपान केला नाही, जास्त वस्तू आणल्या नाहीत, तसेच घरगुती कारणावरून सासरच्यांनी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला. तिला घराबाहेर न निघू देता तिच्यावर पाळत ठेवली. या त्रासाला कंटाळून विवाहितेने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील राहत्या घराच्या बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या केली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT