पिंपरी-चिंचवड

विजेच्या वाढत्या दरामुळे दळण महागले आजपासून अंमलबजावणी ः गहू, ज्वारी, बाजरी प्रतिकिलोचा दर सात रुपये

CD

पिंपरी, ता. ३१ ः महागाई आणि विजेच्या वाढत्या दरामुळे पीठ गिरणीचालकांनी दळणाचा दर एक रुपयाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारपासून (एक नोव्हेंबर) हा निर्णय लागू होणार आहे. सात रुपये प्रतिकिलो या दराने गहू, ज्वारी, बाजरीचे दळण मिळणार आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार असून, दरवाढीची झळ त्यांना सोसावी लागणार आहे.
आकुर्डी येथील खंडोबाच्या मंदिरात पिंपरी चिंचवड चालक-मालक पीठ गिरणी महासंघाची बैठक झाली. शहरातील विविध भागांमध्ये सध्या प्रतिकिलो गहूमागे आता सहा रुपये आकारण्यात येतात. यामध्ये गेल्या चार वर्षांनंतर आता बदल होणार आहे. गिरणीच्या सुट्या भागाच्या वाढलेल्या किमती आणि वाढलेले वीजदर यामुळे पीठ गिरणीमालकांच्या संघटनेने दळणाचे दर एक रुपयाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पीठगिरणीत वाढीव दराचे पत्रक
प्रत्येक पीठगिरणीत वाढीव दराचे पत्रक लावण्यात येणार आहे. गहू, ज्वारी, बाजरी यांच्या दळणाचे दर एक रुपयाने वाढला आहे. सध्या सहा रुपये किलो या दराने दळून दिले जात होते. गेल्या काही वर्षांपासून एकच दर सुरू होता. एकाच भागात एकापेक्षा अधिक गिरण्या झाल्यामुळे स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे सर्वांसाठी एकच निर्णय लागू करत नवीन दर जाहीर करण्यात आले आहे.

व्यवसायाला घरघर
या व्यवसायाला सध्‍या घरघर लागलेली आहे. अनेक मोठ्या मॉलमधून त्याचप्रमाणे शहरातील बहुतेक किराणा मालाच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात कंपनीची तयार पीठे विक्रीस आहेत. त्याचप्रमाणे मोठमोठ्या सोसायट्यांमधून घरघंटीद्वारे पीठ गिरणीचा व्यवसाय जोमाने चालू आहे. वाढलेली महागाई, कुशल कामगारांची चणचण, गिरणीच्या सुट्ट्या भागाची दरवाढ, गिऱ्हाईकांची रोडावलेली संख्या यामुळेच हा व्यवसाय डबघाईला आलेला आहे. मक्याचे दळण फक्त १२ रुपये असणार आहे, असे पीठ गिरणी महासंघाचे अध्यक्ष सुरेश लिंगायत यांनी सांगितले.

‘‘पीठ गिरणीचा समावेश औद्योगिक श्रेणीत होतो. त्यामुळे औद्योगिक श्रेणीनुसार वीजदेयक आकारले जाते. ग्रामीण भागात शेतकरी पीठ गिरणीचा व्यवसाय पूरक व्यवसाय म्हणून करतात. त्यामुळे पीठ गिरणीचालकांचा औद्योगिक श्रेणीत समावेश करू नये, अशी आमची मागणी होती. मात्र, या मागणीकडे सातत्याने काणाडोळा करण्यात आला आहे.
-सुरेश लिंगायत, अध्यक्ष, पीठ गिरणी महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : नवले पुलावर अपघाताची मालिका थांबेना! पहाटे स्कूलबस कारला धडकली अन्...; Video समोर

भाजप आमदार करणार तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी, नियमबाह्य काम केल्याचा आरोप

Indigo Flight Update : 'इंडिगो'चा माफिनामा, आजपासून विमानसेवा सुरळीत चालणार, कसं असेल वेळापत्रक...

Latest Marathi News Update : मध्यप्रदेशात १० नक्षलवाद्यांचेआत्मसमर्पण

Sakal Suhana Swasthyam : महाविद्या आपल्याच भावनांचे विश्‍व : सीमा आनंद

SCROLL FOR NEXT