पिंपरी-चिंचवड

स्वागत दिवाळीअंकांचे

CD

१) मेहता मराठी ग्रथंजगत

‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ या अग्रगण्य प्रकाशन संस्थेच्या मेहता मराठी ग्रंथजगत या दिवाळी जोडअंकाचे हे २४ वे वर्ष आहे. यंदा ‘कोण म्हणतं मराठी वाचक कमी झालाय!’ हा या अंकाचा मुख्य विषय आहे. या विषयावर प्रा. डॉ. रणधीर शिंदे, सदानंद कदम, डॉ. शोभा नाईक, प्रा. सुहास निर्गुण,  सुमेध इंगळे आदींचे वाचन संस्कृतीवरील लेख आहेत. त्याचप्रमाणे ‘भावार्थ’चे प्रसन्न करंदीकर, ‘वाचनवेडा समूहा’चे विनम्र भाबल, ‘पुस्तकप्रेमी समूहा’चे कृष्णा दिवटे यांचे विशेष लेख आहेत. फारुक काझी, एकनाथ आव्हाड यांनी लिहिलेल्या बालकथा आहेत. समाधान मलवडकर, पुष्कर पाटील, उत्कर्षा मिसाळ-गायकवाड यांच्या कविता आहेत. याशिवाय ‘अजून येतो वास फुलांना’-वि. स. खांडेकर, ‘संस्मरणे’- शांता शेळके, ‘प्रवास  ः एका लेखकाचा’़- व्यंकटेश माडगूळकर, ‘गप्पागोष्टी’- द. मा. मिरासदार, ‘अनुवादातून अनुसर्जनाकडे’-लीना सोहोनी, ‘वपुर्झा’ - व. पु. काळे अशा पुस्तकांतील वाचनीय अंश पुस्तकाच्या पानांतून या विभागात दिला आहे.  मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘मराठी वाचनसंस्कृती आणि वाचक’ या औचित्यपूर्ण विषयाला वाहिलेला हा अंक वाचनीय झाला आहे. 
संपादक ः अखिल मेहता, पाने ः १४४, किंमत ः १०० रुपये
--------------
२) आनंदतरंग
डॉ. तारा भवाळकर, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, राजेंद्र खेर यांसारख्या मान्यवर लेखकांच्या लेखांचा समावेश असलेला आनंदतरंग हा दिवाळी अंक आनंदाची लयलूट करतो. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याचे महत्त्व सांगितले आहे, तर डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी ‘अजरामर स्वरांची देवता: आशा’ या लेखात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याबद्दलची आठवणी शब्दबद्ध केल्या. अरुणा अंतरकर यांनी मोठ्या ताऱ्यांचे मोठेपण सांगितले आहे तर, डॉ. कल्याणी नामजोशी यांनी संत वचनांचे इंगित सांगितले आहे. डॉ. विजय भटकर यांचा सुपर कॉम्प्युटर ते जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा आणि आशुतोष बापट यांचा डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या कार्याची ओळख करून देणारा लेख, देवमाणूस रा. चिं. ढेरे हा प्रा. मिलिंद जोशी आदींचे लेख वाचनीय झाले आहेत. तसेच प्राजक्ता माळी, संकर्षण कऱ्हाडे, जितेंद्र जोशी यांसह अनेक कलाकारांनी त्यांचे अनुभव या अंकात शब्दबद्ध केले आहेत.
संपादक : पराग पोतदार, पाने : १७६, किंमत : २५० रुपये
------------------------------------------------------
३) विनर्स
पहिलाच ‘एआय’ लिखित दिवाळी अंक ‘विनर्स’च्या रूपाने सादर केला आहे. ‘एआय’ म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हा अंक तयार करण्यात आला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याची जाणीव वाचकांना करून देण्यात आली आहे. त्यामुळे, अंकात वाचकांना एकाही लेखकाचे लेख किंवा चित्रकाराच्या हाताने रेखाटलेली चित्रे पाहायला मिळणार नाहीत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ः एक ऐतिहासिक टप्पा, रतन टाटा ः भारताचे द्रष्टे उद्योगपती, मोबाईलच्या विळख्यातील बालपण, महाराष्ट्राची लोककला ः एक संपन्न वारसा, विनचेस्टर मिस्ट्री हाऊस ः एक भयानक सत्यकथा आदी लेख अंकात दिले आहेत.
संपादक ः विनोद शिंदे, सुनील निकम, पाने ः ९६, किंमत ः ३०० रुपये


४) धमालनगरी
खास बालमित्रांसाठी असलेला ‘धमालनगरी’ या दिवाळी अंकात यंदा भावा-बहिणीच्या प्रेमाची कहाणी ‘ओवाळणी’ या कथेमधून लेखक एकनाथ आव्हाड यांनी मांडली आहे. प्रसिद्ध वक्ता डेमोस्थेनियसची जिद्द, दुग्धक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांचे जीवन, यानाची सफर आदी कथाही अंकात देण्यात आल्या आहेत. प्राण्यांमधील मातृत्व, पक्ष्यांची मैत्री करण्याची शिकवण आदींविषयी कथाही वाचनीय आहेत. मनोरंजनाबरोबरच नीतिमूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या कथा मनात नक्कीच घर करतात. डॉ. भालचंद्र सुपेकर, अनिल पिटके, तात्याराव पवार, भास्कर बंगाळे आदींच्या कथा प्रेरक आहेत. डॉ. लता पाडेकर यांची नाट्यछटा आणि डॉ. नीला धडफळे यांचे जंगल बातमीपत्र हे अंकाचे वेगळेपण दर्शवितात.
संपादक ः प्रा. रूपाली अवचरे, पाने ः ७२, किंमत ः १३० रुपये

५) निर्मळ रानवारा
वंचित विकास संस्थेचे ‘निर्मळ रानवारा’ या बाल मासिकाचा दिवाळी अंक एक नवीन विषय घेऊन दरवर्षी प्रकाशित केला जातो. यंदाचा विषय ‘दिवाळी’ असा आहे. चार ते १२ वर्षे वयोगटांपर्यंतच्या मुला-मुलींसाठी निरनिराळ्या कथा, लेख अंकात आहेत. ‘दिवाळी - ७० वर्षांपूर्वीची’ हा ल. म. कडू यांचा कथा वजा लेख, देशाच्या कानाकोपऱ्यातील दिवाळीवरील ‘दिवाळी-सणांची राणी’ हा ऋता गोखले यांचा लेख, बिघडलेले आरोग्याकडे लक्ष वेधणारा दिवाळीतील किल्ला हा सुजाता लेले यांच्यासह अन्य लेखकांचे लेख मुलांना वाचता येतील. ज्योती जोशी यांच्या चित्रकथा, शब्दरंजन कोडे, ‘हे करून पाहा’ यात पेपरच्या पल्पपासून रांगोळी करण्याबाबत दीपा शहा यांचा लेख देण्यात आला आहे.
संपादक ः सुप्रिया कुलकर्णी, पाने ः १३६, किंमत ः ४० रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt Employee Property : ४४ भूखंड, किलोभर सोने, कोटींचा बँक बॅलन्स अन्... कर्मचाऱ्याची ‘सोनेरी’ कमाई पाहून तपास यंत्रणाही हादरली !

Delhi : दिल्लीत सुरक्षा रामभरोसे! चोरट्यांनी महिला खासदाराची सोन्याची चेन हिसकावली, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनला शनि अन् मंगळाचे असे दुर्मिळ योग, 3 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षाव

ENG vs IND,5th Test: खांदा निखळला असतानाही इंग्लंडचा खेळाडू फलंदाजीला उतरणार? Video होतोय व्हायरल; जो रुट म्हणाला...

Kharadi IT Hub : खराडी आयटी हबमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता; व्यावसायिकांना टोळक्यांची दहशत

SCROLL FOR NEXT