पिंपरी-चिंचवड

लहान मुलांच्या लठ्ठपणाने पालक वर्गात चिंता !

CD

पिंपरी, ता. १९ ः जंक फूडचे सेवन, व्यायामाची कमतरता, वाढलेला स्क्रीन टाइम यामुळे लहान मुलांमधील लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली असून २०२५ पर्यंत एक कोटी सत्तर लाख लहान मुले लठ्ठ असण्याची शक्यता डब्लूएचओने वर्तविली आहे. त्यामुळे, पालक वर्गाची चिंता वाढली असून मुलांना योग्य आहार, व्यायामाबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे बनले आहे.

जंकफूड हेच मुख्य कारण
जंकफुडचे अतिसेवन व व्यायामाची कमतरता ही स्थूलता किंवा लठ्ठपणाची मुख्य कारणे आहेत. अनुवंशिकता, मूत्राशयाचे विकार, सांधेदुखी, मेंदूचे विकार या काही आजारांमुळेही लठ्ठपणा उद्भवतो. डब्लूएचओने प्रकाशित केलेल्या अहवालामध्येही जंकफूड व जास्त कॅलरी असलेल्या खाद्यपदार्थांची सहज असणारी उपलब्धता हेच लठ्ठपणाचे मुख्य कारण असल्याचे म्हटले आहे. जगभरातील लठ्ठ मुलांच्या एकूण संख्येपैकी ५० टक्के संख्या ही आशिया खंडातील आहे, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

लठ्ठपणाचा काय धोका ?
लहानपणापासूनच लठ्ठ असणाऱ्या ४३ टक्के मुलांना तरुण वयात इतर आजार होण्याची शक्यता असते. अति लठ्ठपणामुळे ह्रदयरोग, मधुमेह, श्‍वसनाचे विकार, कर्करोग, पोटाचे विकार, मानसिक आजार, एकाकीपणा हे सगळे आजार होण्याची शक्यता जास्त असते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. सध्याचे लठ्ठपणाचे वाढते प्रमाण पाहता पुढील पिढीचे आरोग्य कितपत सुदृढ राहील, याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत.

कारणे काय ?
- लहान मुलांमध्ये वाढलेला स्क्रीन टाइम
- जंकफूडच्या वाढत्या जाहिराती व सहज उपलब्धता
- पाकिट बंद पदार्थांमध्ये वापरलेले अन्नघटक न वाचता पदार्थांचे सेवन करणे
- बदललेली जीवनशैली, मोबाईलचा अतिवापर
- मैदानी खेळांचा अभाव
- व्यायामाबाबतची उदासीनता

कसे टाळता येईल ?
- कमी वयातच संतुलित आहाराची सवय हवी
- स्क्रीन टाइम कमी ठेवावा
- मुलांनी योग्य आहाराबरोबरच नियमित व्यायाम करावा
- गोड पदार्थ, पॅकेज्ड फूडचे प्रमाण कमी करावे
- प्रथिनयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवावे

आकडेवारी काय सांगते...
- प्रत्येक आठ व्यक्तीमागील एका व्यक्तीमध्ये लठ्ठपणा
- २०२२ च्या आकडेवारीनुसार जगभरातील ५ वर्षांखालील ३७ दशलक्ष बालके स्थूल
- ५ ते १९ वर्षे वयोगटातील ३९० दशलक्ष मुलांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक
- १९९० च्या तुलनेत लठ्ठपणाच्या प्रमाणात दुपटीने वाढ
- लठ्ठपणाच्या आजारावरील जगभरातील खर्च २०३० पर्यंत ३ ट्रिलीयन डॉलरवर जाण्याची शक्यता

देशात कुपोषणाप्रमाणेच मुलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा हे चिंतेचे कारण बनले आहे. हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांचे वजन नियंत्रित राहतेय का ? याकडे पालक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे. लहान मुलांना योग्य आहार, व्यायामाबाबत मार्गदर्शन केले पाहिजे. जंकफूडच्या जाहिराती आणि प्रोटिनयुक्त आरोग्यदायी पदार्थांच्या किमती कमी करणे गरजेचे आहे.
- डॉ. श्रीकांत कुऱ्हाडे, लॅप्रोस्कोपिक, रोबोटिक व बॅरिएट्रिक सर्जन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy protest : कोल्हापुरात 'गोकुळ' चे वातावरण तापलं; मोर्चेकरी अन् पोलिसांत झटापट, जनावरे थेट कार्यालयात घुसवण्याचा प्रयत्न

Ranji Trophy : ३८ चेंडूंत १५४ धावा! Vaibhav Suryavashi च्या सहकाऱ्याने ठोकले द्विशतक; बिहारी पोरगा पेटला, एकहाती भाव खाऊन गेला

मी येडा बनलो, तुम्ही नका होऊ! पुण्यात डुप्लिकेट गाड्या दिल्याचा आरोप करत तरुणाचं शोरूमसमोरच आंदोलन, VIDEO VIRAL

Mumbai Crime: तरुणपणी प्रेयसीवर चाकूने वार करुन गायब झाला; तब्बल ४८ वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात 'असा' अडकला

Nashik Jail Video : बघू ते नवलच! नाशिकच्या जेलमध्ये कैद्यांनी केली गांजा पार्टी; धक्कादायक व्हिडिओ अन् फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT