पिंपरी-चिंचवड

पुणे-मुंबई द्रुतगतीचा सेवा रस्ता धोकादायक

CD

सोमाटणे, ता.९ ः नवीन उर्से टोल नाका रुंदीकरणासाठी सेवा रस्त्यालगतचा काही भाग खोदल्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे. तेथे सुमारे साठ फूट खोल खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे, संरक्षक भिंत बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगतच्या गावांच्या दळणवळणासाठी रस्ते विकास महामंडळाच्यावतीने माती, मुरमाचा सेवा रस्ता करण्यात आला होता. गेल्या अडीच दशकांपासून आजूबाजूच्या गावांसह शेतात जाणारे शेतकरी याच रस्त्याचा वापर करत आले आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे टोलनाक्यावर होणारी वाहतूक कोंडी आहे. ती सोडविण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्यावतीने उर्से गावच्या हद्दीतच मुंबई बाजूकडे तीन किलोमीटर अंतरावर टोलनाक्याचे स्थलांतर करण्याचे काम चालू आहे. हा नवीन टोलनाका अठ्ठावीस मार्गिकांचा करण्यासाठी सेवा रस्त्यालगतचा भाग खोदण्यात आला आहे. त्यामुळे, सध्या येथे साठ फूट उंचीची धोकादायक दरी तयार झाली आहे. पावसाळ्यात डोंगर उतारावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे हा सेवा रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे, तेथे वाहन घसरून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ते विकास महामंडळाने पावसाळ्यापूर्वी तातडीने या धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी गुलाब घारे, कचरू पारखी, विलास दळवी, सुनील गुजर, संतोष केदारी आदींसह रस्त्यालगतच्या गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

रस्ते विकास महामंडळाने आश्वासन दिल्यानुसार तातडीने सेवा रस्त्याच्या धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी. द्रुतगती मार्गाखालील मोऱ्यांची साफसफाई करावी.
- सुभाष धामणकर, अध्यक्ष, शेतकरी कृती समिती.
PNE24U24962

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT