पिंपरी-चिंचवड

नेहरूनगरमधील मोठ्या प्राण्यांची दाहिनी बंदच

CD

पिंपरी, ता. ९ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने नेहरूनगर येथे मोठ्या मृत प्राण्यांच्या दहनासाठी दाहिनी लवकरच सुरु होणार असल्याचे पशु वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, महिना उलटला तरीही अद्याप ती सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे, मोठ्या प्राण्यांच्या दहनाची गैरसोय होत आहे.
शहरात मांजर, श्वान अशा लहान प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या दहनासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेच्यावतीने दहनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नेहरूनगर येथे ही व्यवस्था केली आहे. याठिकाणी मे २०२३ मध्ये दाहिनीत बिघाड झाल्याने नवी दाहिनी बसविण्यात आली आहे. लहान प्राण्यांशिवाय येथे गाय, म्हैस, बैल, घोडा या मृत प्राण्यांसाठी देखील दाहिनी असावी, अशी नागरिकांची मागणी होती. याआधी मोठे मृत प्राणी दहन करण्यासाठी पुण्यातच न्यावे लागत होते. हीच अडचण लक्षात घेत महापालिकेच्यावतीने मोठ्या पाळीव प्राण्यांसाठी दाहिनी बसविण्यात येत आहे.
तांत्रिक कामांची पूर्तता केल्यानंतर वाहिनी सुरु करण्यात येईल, असे पशु वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले होते. नेहरूनगर येथेच महापालिकेच्यावतीने प्राणी सुश्रूषा केंद्रात भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या केंद्राच्या माध्यमातून पाळीव आणि भटक्या श्वानांना उपचार दिले जातात. याच ठिकाणी मृत श्वानांसाठी दाहिनी बसविण्यात आली आहे. याच परिसरात मोठ्या प्राण्यांच्या दहनाची देखील आता सोय होणार आहे. मात्र, अद्याप त्याला मुहूर्त लागला नाही. याबाबत पशु वैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT