पिंपरी-चिंचवड

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

CD

पिंपरी, ता. १० : सिग्नल जम्पिंग, ट्रिपल सीट, झेब्रा क्रॉसिंग, फॅन्सी नंबर प्लेट अशा प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ‘सुसाट’ निघणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर चौकांतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बारीक नजर आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून दहा हजार ६२८ बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

चौकात वाहतूक पोलिस असल्यास कारवाईच्या भीतीने काहीप्रमाणात वाहतूक नियम पाळले जातात. मात्र, एखाद्यावेळी चौकात पोलिस हजर नसल्यास आपल्याला कोणीच काहीही करू शकत नाही, अशा आविर्भात बेशिस्त चालक सुसाट वाहन दामटतात. लाल सिग्नल असतानाही न थांबता पुढे निघून जातात. धोकादायकरीत्या ट्रिपल सीट बसून दुचाकीवर मिरवतात. मात्र, अशा बेशिस्त चालकांवरही पोलिसांची सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर असते. याचे भान त्यांना राहत नाही.

शहरातील चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांचे नंबर कॅमेऱ्यांच्या मदतीने टिपले जातात. त्यानंतर संबंधित चालकाला ऑनलाइन दंड आकारला जात आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष निगडी येथे आहे.

झेब्रा क्रॉसिंग करणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई
लाल सिग्नल लागल्यानंतर झेब्रा क्रॉसिंगच्या आत वाहन थांबवणे आवश्यक आहे. मात्र, हिरवा सिग्नल येईपर्यंत अनेकांना एका जागी थांबवत नाही. थेट झेब्रा क्रॉसिंग करून थांबतात. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यास अडथळा निर्माण होतो. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या एकूण कारवाईत झेब्रा क्रॉसिंग करणाऱ्या सात हजार ५२१ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

... अन्यथा कारवाईला सामोरे जा
चौकातील कॅमेऱ्यामध्ये प्रत्येक वाहन टिपले जात आहे. यासह इतर हालचालींवरही बारीक लक्ष असते. त्यामुळे प्रत्येक वाहन चालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

महिनानिहाय कारवाई
प्रकार / जानेवारी / फेब्रुवारी / मार्च / एप्रिल / मे / एकूण
ट्रिपल सीट / ३३ / ५५ / ७२ / ११३ / १२२ / ३९५
सिग्नल जम्पिंग / ७६ / ९० / ७२ / १४८ / ११९५ / १५८१
झेब्रा क्रॉसिंग / १११७ / १०५४ / ९१७ / २२०१ / २२३२ / ७५२१
नंबर प्लेट / १८ / ५० / २४ / १६८ / ८७१ / ११३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT