पिंपरी-चिंचवड

लिपिक पदावरील आठ उमेदवारांची नियुक्ती रद्द

CD

पिंपरी, ता. ११ : पिंपरी-चिंचवड महापालिकेने आठ उमेदवारांची लिपिक पदाची नियुक्‍ती रद्द केली आहे. निवड होऊनही पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी आणि शारीरिक तपासणीसाठी उपस्‍थित न राहिल्‍याने महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील विविध पदांसाठी परीक्षा पार पडल्या. त्यापैकी, लिपिक पदासाठी पार पडलेल्या परीक्षांची अंतिम निवड व प्रतिक्षा यादी २० फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. कर्मचारी निवड समितीने गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड केली होती. त्यानुसार, आठ उमेदवारांना पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी व शारीरिक पात्रता तपासणी करून घेण्यासाठी सामान्य प्रशासन विभागात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने कळवूनही हे उमेदवार उपस्थित राहिले नाही. त्यानंतर, त्यांना स्मरणपत्रे पाठवून अंतिम मुदतवाढ दिली होती. त्यानंतरही संबंधित उमेदवार उपस्थित राहिले नाहीत. तसेच लिपिक पदावर रुजू होण्याबाबतचा कोणत्याही पत्रव्यवहार / ई-मेल महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाला केला नाही. त्यामुळे, निवड झालेल्या उमेदवारांना लिपिक पदावरील नोकरीची आवश्यकता नसल्‍याची भूमिका घेत त्यांची नियुक्ती रद्द करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आयुक्तांकडे पाठविला होता. एका उमेदवाराने लेखी / ई-मेलद्वारे लिपिक पदावर रुजू होण्यास इच्छुक नसल्याबाबत कळविले होते. त्यानुसार, उमेदवारांची लिपिक पदावरील नियुक्ती रद्द करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.


लिपिक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना चारित्र्य पडताळणीसाठी बोलावले होते. मात्र, कोणीही आले नाही. तसेच एकाने रुजू होण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले. त्यानुसार, नऊ जणांची निवड रद्द केली आहे.
- विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT