पिंपरी, ता. २१ : ऊर्जा कनेक्टिव्हिटी विषयावरील आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्चस्तरीय बैठकीत पिंपरी-चिंचवडच्या सोनाली झोळ यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. तुर्कमेनिस्तान, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि आशिया आणि पॅसिफिकसाठी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोगाच्या तज्ज्ञांच्या आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी भारताचे प्रतिनिधित्व केले. १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी तुर्कमेनिस्तान येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेत झोळ यांनी दहशतवादी हल्ल्यापासून ऊर्जा संसाधनांचे संरक्षण करण्याबाबत भूमिका मांडली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाची ही बैठक मानली जाते. या परिषदेत सुमारे ५० देशांतील प्रतिनिधी उपस्थित होते, अशी माहिती झोळ यांनी दिली. सोनाली झोळ यांना संयुक्त राष्ट्राच्या युवा प्रतिनिधी असून, नासाच्या सदस्य आहेत. त्यांना आशिया आणि पॅसिफिकसाठी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोगाचे युनिस्केप (UNESCAP) युनायटेड नेशन, तुर्कमेनिस्तानचे स्थायी मिशन, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, तुर्कमेनिस्तान, युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक कमिशन फॉर युरोप यांचे वैयक्तिक निमंत्रण पत्र मिळाले होते. ऊर्जा कनेक्टिव्हिटीवरील तज्ज्ञांच्या आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी हे निमंत्रण होते. या बैठकीत ऊर्जा मंत्रालय पाकिस्तान, भूतान, रशियन दूतावास, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी आयएईए, सार्क आणि अनेक आंतरराष्ट्रीय आंतरसरकारी संघटना देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत झोळ यांनी ऊर्जा संसाधनावर दहशतवादी हल्ले टाळण्यासाठी भूमिका विशद केली. या बाबतची माहिती बाहेर पडू देऊ नये, असा नियम करण्याची सूचना देखील केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.