पिंपरी, ता. १ : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने तीन सराईत गुन्हेगारांना अटक करून, त्यांच्याकडून पाच पिस्तूल व वीस जिवंत काडतूस जप्त केले आहेत. ही कारवाई तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली. या आरोपींनी दहशत माजविण्यासाठी व विक्रीसाठी हे पिस्तूल जवळ बाळगल्याचे समोर आले.
उमेश चंद्रकांत केदारी (वय २८, रा. पुनावळे), मंथन ऊर्फ गुड्डु अशोक सातकर (वय २८, रा. कान्हे, ता. मावळ), विशाल ज्योतिराम खानेकर (वय ३०, रा. मोहितेवाडी, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तळेगाव दाभाडे परिसरात तीन जण नंबरप्लेट नसलेल्या मोटारीत फिरत असून, त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सापळा रचून, तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून पाच पिस्तूल, २० जिवंत काडतुसे, दोन मोकळ्या मॅग्जीन, तीन मोबाईल व मोटार असा एकूण ८ लाख ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी दहशत माजविण्यासाठी व विक्रीसाठी हे पिस्तूल जवळ बाळगल्याचे समोर आले. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
यातील आरोपी उमेश केदारी याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह एकूण चार गुन्हे दाखल आहेत. आरोपी मंथन सातकर याच्यावर खुनाच्या प्रयत्नासह एकूण तीन गुन्हे तर आरोपी विशाल खानेकर याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.