पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

चेंबर, पेव्हिंग ब्लॉकचे काम निकृष्ट
नढेनगर, काळेवाडी येथील अजिंक्य कॉलनी, गल्ली क्रमांक- दोनमध्ये (सोनीगरा रेसिडेन्सीजवळ) सहा महिन्यांपूर्वी नवीन सांडपाणी वाहिनी टाकण्यात आली. परंतु वाहिनीच्या चेंबर आणि त्या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लॉकचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे चेंबरच्या बाजूचा भाग आणि तो रस्ताही अनेक ठिकाणी खचलेला आहे. हा प्रकार रहदारीस धोकादायक झाला आहे. त्या ठिकाणी महिलेचा नुकताच किरकोळ अपघात झाला. याची नोंद घेऊन संबंधित रस्त्याची आणि चेंबरची दुरुस्ती त्वरित करावी.
- तानाजी एकोंडे, काळेवाडी
NE25V58984

अनधिकृत जाहिराती लावण्यासाठी वृक्षतोड
आकुर्डीतील श्री तुळजाभवानी मंदिराशेजारी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि अनधिकृत जाहिराती लावणाऱ्यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या सुमारास वृक्षतोड केली आहे. फ्लेक्सच्या जाहिरातीच्या होर्डिंगसाठी वृक्षतोड करण्याचे हे प्रकार वारंवार घडत आहेत. असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे या प्रकारांत वाढ होत आहे.
-श्‍याम पाटील, आकुर्डी
PNE25V58981

काळाखडक-वाकड मार्गावर डांबरीकरण अर्धवट
काळाखडक-वाकड मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी अर्धवट डांबरीकरण झाले आहे. त्यावरील खडी विखुरलेल्या अवस्थेत आहेत. नाल्याचे झाकण निघून दुर्गंधी वाढली आहे. या अवस्थेकडे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. या परिसरात तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
- विवेक म्हसकर, वाकड
PNE25V58983

थेरगावात चेंबरची झाकणे उघडी
थेरगावातील दत्तनगर डीपी रोडवरील काही चेंबर्स मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत. शेजारील काही चेंबर्सची झाकणे उघडी आहेत. आतील कचरा कुजल्याने दुर्गंधी वाढली. महापालिकेने योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. या भागात पदपथही नाहीत.
- रमेश पाटील, थेरगाव
PNE25V58982

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT