पिंपरी, ता. १२ : सलग तीन वर्ष मालमत्ता कर भरणा करणाऱ्या मिळकतधारकाला चौथ्या वर्षी कराचा भरणा करताना दोन टक्के अधिकची सवलत देण्यात येणार आहे. त्यासाठी चालू वर्षात नियमित कर भरणाऱ्या करदात्यांना खंड न पाडता थकीत मालमत्ताकर भरून नियमित १० टक्के सवलतीबरोबरच अधिकच्या दोन टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी चालू वर्षाचा मालमत्ताकर त्वरित भरावा, असे आवाहन करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे.
चालू आर्थिक वर्षामध्ये चार लाख ८६ हजार ९६१ मालमत्ताधारकांनी आत्तापर्यंत ७३० कोटींच्या कराचा भरणा केला आहे. तथापि सुमारे तीन लाख २१ हजार मालमत्ताधारकांनी ३३५ कोटी रक्कम २०२३-२४ या वर्षात जमा केली. मात्र, यातील ६९ हजार मालमत्ताधारकांनी चालूवर्षी कराचा भरणा अद्यापही महापालिकेकडे केलेला नाही. या मालमत्ताधारकांनी चालूवर्षी कराचा भरणा न केल्यास ते अतिरिक्त दोन टक्क्यांच्या सवलतीस ते पात्र ठरणार नाहीत. ज्या नागरिकांनी नियमितपणे कराचा भरणा केला आहे, अशा नागरिकांनी चालू वर्षी खंड न पाडता कराचा भरणा करून सवलतीचा लाभ घ्यावा.
शहरातील थकबाकीदारांच्या यादीमध्ये असणाऱ्या शाळा, हॉटेल, हॉस्पिटल, कारखाने, मॉल यासारख्या व्यावसायिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुद्धा करण्यात येत असून, आत्तापर्यंत जवळपास ७५७ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ज्यांनी जप्त मालमत्तेचा थकीत कर आज अखेर महापालिकेकडे जमा केलेला नाही, अशा जप्त मालमत्तांवर लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या बाबत लवकरच लिलावाची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, अशा मालमत्ता धारकांनी २५ फेब्रुवारी २०२५ पूर्वी संपूर्ण कराची थकबाकी महापालिकेकडे जमा करावी.
सलग तीन वर्षे नियमितपणे कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना चौथ्या वर्षीच्या मालमत्ताकरामध्ये सवलतीव्यतिरिक्त अधिकच्या दोन टक्क्यांची सवलत देण्यात येत आहे. नियमित कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांनी चालू वर्षी अद्यापही कराचा भरणा केला नसेल तर अशा मालमत्ताधारकांना सलग तीन वर्षे नियमित कर भरल्यानंतर चौथ्या वर्षीच्या मालमत्ताकरावर देण्यात येणारी दोन टक्क्यांची सवलत मिळणार नाही.
- अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.