पिंपरी, ता. १६ : चिंचवड - पुणे बीआरटी मार्गात एम्पायर इस्टेट पुलाअगोदरचा गतिरोधक अधिक उंच असल्याने त्यावरून जाणाऱ्या बसमधील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे गतिरोधक काढण्यात यावेत, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
बीआरटी मार्गामधून बस वेगात धावतात. त्यावेळी पुणे-मुंबई महामार्गावरून ग्रेड सेपरेटरमध्ये जाणाऱ्या वाहनांचे किरकोळ अपघात होण्याच्या घटना शहरात यापूर्वी घडल्या आहेत. त्या कारणाने काही दिवसांपूर्वी बीआरटी मार्गात गतिरोधक बसविण्यात आले. मात्र, हे गतिरोधक जास्त उंचीचे असल्याने तेथून जाताना बसमधील प्रवाशांना जोराचा झटका बसत आहे. अनेकांना मान, पाठीचे दुखणे बळावल्याच्या तक्रारी प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे योग्य पद्धतीचे गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
नागरिक शैलेश शिंदे म्हणाले,‘‘पीएमपीने पुण्याच्या दिशेने जाताना चिंचवड भागात बसविण्यात आलेल्या चुकीच्या गतिरोधकांमुळे मानेला दुखापत झाली. बीआरटी मार्गातून पीएमपी जोरात धावतात. त्यावेळी अधिक उंचीच्या असलेल्या या गतिरोधकावरून बस गेल्यावर मानेला आणि पाठीला झटका लागतो. त्यामुळे दुखापत होत आहेत. लहान आणि ज्येष्ठांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.