पिंपरी-चिंचवड

विकेंडला रस्त्यावर खेळा, नाचा, खा!

CD

पिंपरी, ता. ४ ः पिंपरी कॅम्प परिसरातील सर्व रस्ते, साई चौक ते महर्षी वाल्मीकी चौक रस्त्यावर विकेंडला अर्थात शनिवार (ता. ८) आणि रविवारी (ता. ९) सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत महापालिकेने ‘वाहनमुक्त दिवस’ आयोजित केला आहे. त्यामुळे हे रस्ते पादचाऱ्यांसाठी मोकळे असतील. तिथे झुंबा, लाइव्ह म्युझिक, महिला स्पर्धा, खाद्य स्टॉल्स असा अनोखा उत्सव असेल, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
शहरातील वाढत्या वाहनांमुळे, चालणे, सायकल चालवणे आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे यांसारख्या पर्यायी आणि शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘वाहनमुक्त दिन’ आयोजित केला आहे. त्यासाठी शहरातील सर्वात वर्दळीच्या भागांपैकी एक असलेल्या पिंपरी कॅम्प परिसराची निवड केली आहे. या भागात अंदाजे ताशी आठ हजार नागरिक ये-जा करतात. पादचारीही मोठ्या प्रमाणात असतात. नागरिकांना मोकळ्या रस्त्यांचा आनंद घेता यावा, त्यांना चालता यावे, धावता यावे, बाजार परिसराचा आनंद घेता यावा, यासाठी वाहनमुक्त दिवस आयोजित केला असल्याचे आयुक्तांनी कळविले आहे.

उपक्रमाचे मुख्य आकर्षण...
- नागरिकांसाठी झुंबा, लाईव्ह म्युझिक, महिलांसाठी खेळ, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स
- अनुकूल बाजार परिसर तयार करून मोकळ्या जागांचा आनंद घेता येईल
- बसण्यासाठी आरामदायी सोय असेल
- ‘वाहतूक’ आणि ‘रस्ता सुरक्षा’ विषयावर माहितीपट दाखवण्यात येतील

वाहतूक नियोजन, पर्यायी व्यवस्था
- शनिवार व रविवारी सकाळी नऊपासून महर्षी वाल्मीकी चौक ते शगुन चौक आणि शगुन चौक ते साई चौक दरम्यान वाहने बंद
- शगुन चौकात उड्डाणपुलावरून येणाऱ्या सर्व वाहनांना फक्त उजवीकडे वळण्यास परवानगी, मात्र, आपत्कालीन सेवांसाठी वाहतूक खुली
- पर्यटकांसाठी पार्किंग व्यवस्था, पीएमपी आणि मेट्रो शटल सेवा; कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे मेट्रो स्थानक पीसीएमसी भवन
- बसने येणारे नागरिक लाल मंदिर, भाजीपाला बाजार, भाट नगर बस थांब्यावर उतरू शकतात
- दोन्ही दिवस कॅम्पातील दुकाने सुरू राहतील, माल वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था असेल
- अतिरिक्त मोबाइल शौचालये, बसण्याची सोय आणि पिण्याच्या पाण्याची सोय असेल

‘‘वाहनमुक्त दिवस उपक्रम स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून आणि व्यापारी संघटनांसोबत झालेल्या चर्चांनंतर ठरवला आहे. हा उपक्रम प्रायोगिक आहे. नागरिकांनी याचा अनुभव घेऊन वाहनमुक्त दिवस संकल्पनेला पाठिंबा द्यावा.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका

‘वाहनमुक्त दिवस’ या दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून रस्ता सुरक्षा उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. त्याचबरोबर, कार्यक्रमस्थळी येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा.
- बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT