पिंपरी, ता. ४ ः पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या १८९ वाहनांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन मालक, चालक व वित्तदात्यांनी ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहनांचा कर व दंड त्वरित भरून वाहने सोडवून घेऊन जाण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी, मोटार वाहन कायद्यातील अन्य गुन्ह्यांतर्गत वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड, तळेगाव एसटी बस डेपो, तळेगाव पोलिस स्टेशन, खेड, राजगुरुनगर एसटी बस डेपो, वल्लभनगर एसटी बस डेपो येथील आवारात ठेवली आहेत. वाहन एकाच जागी उभे असल्याने त्यामधून पेट्रोल/डिझेल गळती होऊन आग लागण्यासारखे प्रकार देखील घडले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि वाहनाने व्यापलेली जागा रिक्त करून घेण्यासाठी ‘आरटीओ’ने या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. चार मार्चपासून पुढील ३० दिवसात वाहनांचा कर व दंड भरून वाहने सोडवून घेऊन न गेल्यास त्या वाहनांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय आरटीओ प्रशासनाने घेतला आहे. या वाहनांची यादी आरटीओ कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रदर्शित केलेली आहे. जाहीर लिलावाची तारीख, वाहनाचा समावेश, वेळ व ठिकाण eauction.gov.in/ www.mstcindia.co.in या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परिवहन आयुक्त यांच्या आदेशानुसार वाहन रस्त्यावर वापरण्यायोग्य असल्यास eauction.gov.in व वाहनाचे वयोमान १५ वर्ष पूर्ण असल्यास, वाहन रस्त्यावर वापरण्यायोग्य नसल्यास www.mstcindia.co.in या संकेत स्थळावर वाहनाचा लिलाव करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.