पिंपरी-चिंचवड

जुन्या ऊर्से टोलनाक्यावरील राडारोडा हटवण्याचे काम सुरू

CD

सोमाटणे, ता. ९ ः जुन्या ऊर्से टोलनाक्यावरील वाहनास अडथळा ठरणारे शेड, टोलबुथ व बांधकामासह सर्व राडारोडा हटवणे गरजेचे होते. परंतु, रस्ते विकास महामंडळाकडून राडारोडा न हटवल्याने येथे अपघात होण्याचे प्रकार सुरू होते. याबाबतचे वृत ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर राडारोडा हटवण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.
टोलनाक्यावरील होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या वतीने जुना उर्से टोलनाका हा मुंबई दिशेला दोन किलोमीटर अंतरावर स्थलांतरित करून टोलबुथची संख्या चौदावरून अठ्ठावीस करण्यात आली. टोलनाका स्थलांतरित केल्यानंतर जुन्या उर्से टोलनाक्याचे वाहनास अडथळा ठरणारे शेड, टोलबूथ व बांधकामासह सर्व राडारोडा हटवणे गरजेचे होते. परंतु, रस्ते विकास महामंडळाने टोलचा राडारोडा न हटवल्याने दोन्ही बाजूने वेगात आलेल्या अनेक वाहनचालकांना अचानक रस्त्यालगतचा राडारोडा दिसत असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रकार होत होते. याबाबतचे वृत ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर रस्ते विकास महामंडळाने दखल घेऊन जुन्या उर्से टोलनाक्यावरील राडारोडा हटवण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. सध्या बूथचे बांधकाम, लोखंडी संरक्षक कठडे व बाजूचे अॅंगल हटवण्यात आले आहे. एक महिन्यात सर्व राडारोडा हटवण्याचे काम पूर्ण होणार आहे.

PNE25U96214
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heatwave Alert : महाराष्ट्रात उन्हामुळे अलर्ट! कामगारांना दुपारी १२ ते ४ या वेळेत सक्तीची विश्रांती; शासनाची SOP काय?

Crime: मांजर-बोक्याचं झेंगाट; ४ पिल्लांच्या जन्मामुळे मालकांमध्ये युद्ध पेटलं, मालकिनीनं शेजारच्यावर माऊला फेकलं अन्...

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

CBSE Class 10 Result 2026 OUT! तुमचा 10वीचा निकाल कसा पाहायचा? स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत जाणून घ्या

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

SCROLL FOR NEXT