पिंपरी-चिंचवड

रेल्वे स्थानकांची कामे मुदत संपूनही संथ गतीने

CD

अविनाश ढगे - सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. ९ ः गेल्या वर्षभरापासून अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत चिंचवड आणि आकुर्डी रेल्वे स्थानकांवर सुरू असलेली पुनर्विकासाची केवळ ५० ते ५५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तर तळेगाव रेल्वे स्थानकाचे कामही संथ गतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानकांना कामांना गती कधी मिळणार ? असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २६ फेब्रुवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चिंचवड रेल्वे स्थानकासह देशातील ५५४ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाचा प्रारंभ केला होता. त्यात पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील आकुर्डी, चिंचवड आणि तळेगावसह पुणे विभागातील १६ रेल्वे स्थानकांचा समावेश होता. चिंचवड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासावर २०.४० कोटी रुपये तर आकुर्डी रेल्वे स्थानकावर ३३.८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. गेल्या वर्षी या तीनही रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण सुरू झाले. मात्र, हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून चिंचवड आणि आकुर्डी रेल्वे स्थानकांचे आतापर्यंत केवळ ५० ते ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी आणि पादचारी पूल उभारण्यासाठी ३१ मार्च २०२५ ची मुदत आहे. आताच्या कामाच्या गतीवरून पादचारी पुलाचे काम मुदतीत पूर्ण होईल का ? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले.

कामांचे नियोजन अन् सद्यःस्थिती...

चिंचवड रेल्वे स्थानक -
- प्लॅटफार्म क्रमांक एकच्या बाजूला असलेल्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम पूर्ण
- सरकता जिना आणि उद्‍वाहक उभारणी
- प्लॅटफार्म क्रमांक दोन आणि तीनच्या दरम्यान एका उद्‍वाहकाचा ढाचा बसवून तयार
- प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि तीनवर स्वच्छतागृहाचे काम सुरू
- प्रतीक्षालय, पदपथ, वाहनतळ आणि इतर कामांना अजूनही सुरुवात नाही
- प्लॅटफार्म क्रमांक तीनच्या बाजूने जिना उभारण्यासाठी खड्डे खोदाई. मातीचे ढिगाऱ्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप

आकुर्डी रेल्वे स्थानक -
- प्रतिक्षालय, प्रशस्त वाहनतळासह विविध सुविधा देण्याचे नियोजन
- वर्षभरात केवळ दोन उद्‍वाहक बसविण्याचे काम पूर्ण
- प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला प्रतिक्षालयाचे काम चालू
- प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम २५ ते ३० टक्के पूर्ण
- दिव्यांग आणि सर्वसामान्यांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचे काम पूर्ण

तळेगाव रेल्वे स्थानक -
- पुनर्विकासाचे कामही संथ गतीने सुरू
- आतापर्यंत केवळ मुख्य प्रवेशद्वार आणि स्वच्छतागृहाचे काम
- वाहनतळ, प्लॅटफार्मची दुरुस्ती, प्रतिक्षालय, दोन उद्‍वाहन अशी सर्व कामे पूर्ण होणे बाकी

कोणती कामे होणार?
अमृत भारत योजनेअंतर्गत उद्‍वाहन (लिफ्ट), सरकता जिना, प्रशस्त प्रतिक्षालय, स्वच्छतागृह, डिजिटल माहितीफलक, डिझाइन केलेले चिन्ह, पदपथ, सुनियोजित वाहनतळ साकारले जाणार आहे.

रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची काही कामे आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण, सर्वच कामे थोडी थोडी पूर्ण झाली आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही कामे कधीपर्यंत पूर्ण होणार याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही.
- मयुरेश जव्हेरी, सदस्य, रेल्वे प्रवासी संघटना

चिंचवड रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी खर्च - २०.४० कोटी
आकुर्डी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी खर्च - ३३.८ कोटी
चिंचवड प्रवासी संख्या - ८ ते ९ हजार

आकुर्डी प्रवासी संख्या - ६ ते ७
लोकल फेऱ्या - ४२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT