पिंपरी, ता. ९ ः पिंपरी न्यायालयाचा ३६ वा वर्धापन दिन व जागतिक महिला दिन सोहळा प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक हे होते. नेहरूनगर येथील इमारतीमध्ये सुरू असलेले एकूण दहा दिवाणी फौजदारी न्यायालय याच्या ३६ वर्षांतील प्रवासातील आठवणींना उजाळा देण्यात आला.
देशात ढासळत चाललेली विवाह संस्था, भारतात रुजत असलेली लिव्ह- इन- रिलेशनशिप संस्कृती, महिलांच्या हक्काच्या दिशेने घडलेल्या घडामोडी, महिला दिनाची सुरुवात विविध प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महिलांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी दिलेले निकाल यावर न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी भाष्य केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विकास ढगे पाटील, पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल. टिकले, पुणे बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड, सचिव ॲड. गोरक्षनाथ लोखंडे, आकांक्षा पिंगळे, अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर व बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी व वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त २७ मार्च ते ४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. ‘ती होती... ती आहे आणि ती राहणार’ या महिला सक्षमीकरणाच्या नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार, सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रीना मगदूम, सहसचिव ॲड. राकेश जैद, खजिनदार ॲड. अक्षय फुगे, ॲड. शंकर घंगाळे, ॲड. संकेत सरोदे, ॲड. राजेश राजपुरोहित, ॲड. मानसी उदासी, ॲड. सीमा शर्मा, ॲड. विकास शर्मा, ॲड. संघर्ष सूर्यवंशी यांनी सोहळ्याचे आयोजन केले. ॲड. सुहास पडवळ यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.