पिंपरी, ता. १० ः स्माइल व्यसनमुक्ती केंद्राचा चौथा वर्धापनदिन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी स्माइलच्यावतीने देण्यात येणारा व्यसनमुक्तीतून स्वप्नपूर्तीकडे हा पुरस्कार प्रसाद ढवळे, समाजकार्यातून स्वप्नपूर्तीकडे हा पुरस्कार अंबादास चव्हाण यांना देण्यात आला.
पुणेरी पगडी, शाल व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. ज्येष्ठ सिनेनाट्य कलाकार शरद पोंक्षे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर व ज्येष्ठ कलाकार अविनाश नारकर उपस्थित होते. ‘मादक पदार्थांच्या व्यसनाऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारांचे व्यसन लावून घ्यावे.’ असे पोंक्षे यांनी सांगितले. मादक पदार्थांचा पुरवठा व वितरण थांबवण्यासाठी लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. स्माइलचे संस्थापक हर्षल पंडित यांनी प्रास्ताविक केले. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. राहुल बोरुडे, हर्षल जोशी, रोहन यादव, अनिल सावंत, राहुल केळकर, प्रकाश धिडे, नितीन नाटेकर, प्रणव देशमुख यांच्यासह स्माईलच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.