पिंपरी-चिंचवड

सुरक्षित अन् प्रवासयोग्य रस्त्यांना प्राधान्य

CD

पिंपरी, ता. ११ ः शहरातील रस्ते सर्वांसाठी अधिक सुरक्षित आणि प्रवासयोग्य करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी पादचारी, सायकलस्वार, पीएमपी, एसटी व मेट्रो प्रवासी आणि दुचाकीस्वारांना प्राधान्य दिले जाणार आहे. या सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून रस्त्यांचा आराखडा तयार केला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
शहरातील रस्ते अधिक सुरक्षित करण्याच्या उ‌द्देशाने धोकादायक चौकांचा पुनर्रचना प्रकल्प आणि सुरक्षित शाळा क्षेत्र प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी महापालिकेतील अभियंते आणि पिंपरी-चिंचवड पोलिस अधिकाऱ्यांसाठी ‘फंडामेंटल्स ऑफ सेफर स्ट्रीट्स’ कार्यशाळा आयोजित केली होती. त्यासाठी ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी अंतर्गत भागीदार ग्लोबल डिझाईनिंग सिटीज इनिशिएटिव्ह (जीडीसीआय) यांचे सहकार्य लाभले. त्यामध्ये अभियंत्यांना सुरक्षित रस्ते डिझाइनविषयी मूलभूत माहिती देण्यात आली. ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित कार्यशाळेत शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, पोलिस उपआयुक्त बापू बांगर, जीडीसीआयचे प्रोग्राम मॅनेजर जसवंत तेज कासला यांच्यासह महापालिकेतील अभियंते, पोलिस व मेट्रो अधिकारी आणि सल्लागार असे ७३ जण सहभागी झाले होते.

कार्यशाळेतील माहिती
- स्थानीय संदर्भ लक्षात घेऊन अभियंते व पोलिस अधिकाऱ्यांना जागतिक सर्वोत्तम रस्ते पद्धतींची माहिती
- पादचारी, सायकलस्वार, दुचाकीस्वार, सार्वजनिक वाहतूक वापरकर्त्यांच्या दृष्टिकोनातून रस्त्यांचे मूल्यमापन
- जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धती, ग्लोबल स्ट्रीट डिझाइन मार्गदर्शिकेतील तत्त्वे व नवीन साधनांचा समावेश

असे केले रस्ते निरीक्षण
- लहान मुलांच्या उंचीच्या (सुमारे ३.२ फूट) कोनातून रस्त्यांचे निरीक्षण करणारे उपकरणांचा वापर
- काही अधिकाऱ्यांनी व्हीलचेअरचा वापर केला
- डोळ्यांवर पट्टी बांधून अपंग व्यक्तींच्या दृष्टिकोनातूनही रस्त्यांचे मूल्यमापन केले

पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेवर होणाऱ्या वेगाच्या परिणामावर कार्यशाळेत भर दिला. सातत्यपूर्ण कारवाई आणि अभियांत्रिकी उपाय वापरून वेग कमी करणे, रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यासाठी महापालिकेबरोबर समन्वय साधत अभियांत्रिकी मानकांचा अवलंब करून योग्य अंमलबजावणी करू.
- बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT