बिजलीनगरजवळ मोठा खड्डा
बिजलीनगर सिग्नल ते हनुमान स्वीट या रस्त्यावर खूप दिवसांपासून खड्डा पडला आहे. या मार्गावरून येणारी वाहने त्यात जोरात आदळतात. परिणामी, मोठा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. दोन ते तीन खड्डे आहेत. तरी महापालिकेने ते बुजवावेत.
- वाल्मीक शर्मा, बिजलीनगर
5U97248
बिर्ला जवळील पुलाजवळ कचरा
बिर्ला हॉस्पिटलकडून चिंचवडगावात येताना पुलाजवळ उजवीकडे सर्व गटारांच्या मोठ्या वाहिन्यांद्वारे पाणी नदीच्या पात्रात जमा होते. शिवाय नागरिक कचरा टाकतात. त्याने दुर्गंधी पसरुन रोगराईचा सगळ्यांनाच सामना करावा लागतो. इथे मोठी कचराकुंडी ठेवावी किंवा लोखंडी वाहिन्यांना उंच पत्रे लावून त्या कायमस्वरूपी बंदिस्त कराव्यात. महापालिकेने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना विनाविलंब करावी. हीच विनंती.
- रमेश पाटील, चिंचवड
25U97245
दूषित पाण्याचा पुरवठा
‘ड’ क्षेत्रीय कार्यालय येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीला झाकणेच नाहीत. नागरिक दूषित पाणी पित आहेत. रहाटणी येथे ‘ड’ क्षेत्रीय कार्यालया शेजारी पाण्याच्या तीन टाक्या आहेत. त्यातील अनुक्रमे संपूर्ण रहाटणी गाव, कस्पटे वस्ती, जगताप डेअरी, कुणाल आयकॉन रस्ता या ठिकाणी नागरिकांना पिण्यासाठी दूषित पाणी पुरवले जाते. हा नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. टाकीला झाकणे नसल्यामुळे त्यात पावसाचे पाणी घुसते. अनेकदा पक्षी त्यात मरुन पडलेले असतात. असे घाण पाणी नागरिकांना पुरवले जाते, ही फार गंभीर बाब आहे.
- संजय गायखे, काळेवाडी
25U97247
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.