अश्विनी पवार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १२ : मराठी वर्षातील शेवटचा सण म्हणजे धुळवड.. सण सणाचा आनंद एकमेकांना रंग लावून लुटला जातो. पिंपरी चिंचवड शहरात धुळवडीला रंग खेळण्याचे प्रमाणही मोठे आहे. मात्र, हे रंग खेळताना योग्य काळजी घेतली नाही तर त्याचे दुष्परिणाम त्वचा व डोळ्यांवर दिसून येतात. त्यामुळे धुळवड खेळा, पण ते खेळताना काळजी घ्या असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.
नैसर्गिक व कोरड्या रंगांचा वापर
धुळवडीला शहरात रस्तोरस्ती, कॉलनीमध्ये, सोसायट्यांच्या आवारात रंग खेळले जातात. बऱ्याचदा हे रंग रसायनमिश्रित असतात. अशा प्रकारे रंग खेळणे हे त्वचा व केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. तसेच ते डोळ्यांत गेल्याने डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे असा अपाय होऊ शकतो. म्हणूनच नैसर्गिक आणि कोरड्या रंगांनीच धुळवड खेळण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
वाढत्या उन्हाचाही त्रास
सध्या शहरातील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविले जात आहे. यामुळे शरीराचे निर्जलीकरण होणे, त्वचेला पुरळ येणे अशा समस्या उद्भवू शकतात. अशा वातावरणात उन्हात रंग खेळल्यामुळेही अपाय होऊ शकतो. त्वचेला पुरळ येणे, त्वचा लाल होणे, खाज सुटणे, केस कोरडे होणे, डिहायड्रेशन असा त्रास होऊ शकतो.
रंग खेळण्यापूर्वी ही काळजी घ्या
- रंग खेळण्यापूर्वी त्वचेला व केसांना तेल, मॉइश्चराझर किंवा सनस्क्रिन लावावे
- रंगाशी थेट संबंध येऊ नये, म्हणून पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे
- भरपूर पाणी प्यावे, उन्हात होळी खेळणे टाळा
- डोळ्यांच्या सुरक्षेसाठी गॉगल वापरा
- पिवळा, गुलाबी अशा सौम्य रंगांचा वापर करा
रंग खेळल्यानंतर काय काळजी घ्याल
- कोरडे रंग खेळल्यानंतर पाणी फवारू नका
- अंगावरील रंगाचा थर व कपडे झटकून टाका
- कोमट पाण्याने व सौम्य साबणाने अंघोळ करा
- डोळे थंड पाण्याने धुवा
- रंग काढण्यासाठी त्वचा घासू नका
- रंग खेळल्यानंतरही भरपूर पाणी प्या
- केस व त्वचा कोरडी पडू नये, यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रसाधने वापरा
- त्वचेवर रंग राहिल्यास मुरूम, फोड येऊ शकतात त्यामुळे त्वचेला स्क्रब करायला विसरू नका
नैसर्गिकरित्या बनवलेल्या रंगांनी धुळवड खेळल्यास त्वचा व केसांना अपाय होत नाही. मात्र, रंग व पाणी एकत्रितरित्या खेळल्यास त्वचेवरील रंग निघण्यास वेळ लागतो. त्यामुळे शक्यतो कोरडे रंग वापरावेत. उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे. रंग खेळल्यानंतर व खेळण्यापूर्वी विशेष काळजी घ्यावी.’
- डॉ. पल्लवी डोळस, कन्सल्टंट कॉस्मेटोलॉजिस्ट व ॲस्थॅटिक फिजिशियन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.