पिंपरी-चिंचवड

हवा प्रदूषणाबाबत पर्यावरण मंत्र्यांना साकडे

CD

पिंपरी, ता. १२ ः पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात धुळीचे साम्राज्य आणि हवा प्रदूषणामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये उच्चाधिकार समितीची बैठक घ्यावी. तसेच हवा प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी मुंडे यांना निवेदन दिले. त्यामध्ये म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील सोसायटीधारकांनी रस्त्यावर उतरून मूक मोर्चा काढून हवा प्रदूषणाबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. सिमेंट मिश्रित धूळ त्वरित बंद व्हावी. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम आणि उपाय योजना लागू कराव्यात. वायू प्रदूषण पातळीची नियमित तपासणी करून त्याबाबतचा अहवाल सार्वजनिक करावा. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून आवश्यक ती आरोग्य सेवा पुरवावी. रस्त्यांवरील झाडांची नियमित देखभाल करावी, यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था यांना आदेश द्यावेत, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली.

हवा गुणवत्ता निर्देशांक चिंताजनक...
पिंपरी-चिंचवडमध्ये हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार बुधवारी (ता. १२) गवळीनगर १२७, पार्क स्ट्रीट वाकड १४०, थेरगाव १२७, भोसरी २६०, भूमकरनगर २७१, ट्रान्सपोर्टनगर निगडी १४० असा हवा गुणवत्ता निर्देशांक होता. मानवी आरोग्यासाठी किंवा निसर्ग परिसंस्थेसाठी ० ते ५० असा हवा गुणवत्ता निर्देशांक चांगला मानला जातो. ० ते १०० पर्यंत मध्यम आणि १०० ते २०० पर्यंतचा हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे नागरी आरोग्यावर वाईट परिणाम करणारा आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एकाही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक ५० पेक्षा कमी नाही, ही बाब चिंताजनक आहे.

पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील हवा प्रदूषणाला प्रतिबंध करण्यासाठी ठोस उपाययोजना आणि नियमांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असून त्या दृष्टीने पर्यावरण विभागाची उच्चाधिकार समितीची बैठक नियोजित करावी. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी यांना सूचना मांडण्याची संधी मिळावी. यावर पर्यावरण विभागाच्यावतीने सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heatwave Alert : महाराष्ट्रात उन्हामुळे अलर्ट! कामगारांना दुपारी १२ ते ४ या वेळेत सक्तीची विश्रांती; शासनाची SOP काय?

Crime: मांजर-बोक्याचं झेंगाट; ४ पिल्लांच्या जन्मामुळे मालकांमध्ये युद्ध पेटलं, मालकिनीनं शेजारच्यावर माऊला फेकलं अन्...

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

CBSE Class 10 Result 2026 OUT! तुमचा 10वीचा निकाल कसा पाहायचा? स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत जाणून घ्या

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

SCROLL FOR NEXT