पिंपरी-चिंचवड

विद्यार्थ्यांनी सादर केले नावीन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक प्रकल्प

CD

विज्ञान प्रदर्शनातून दिसून आली विद्यार्थ्यांची कल्पकता
विद्यार्थ्यांनी सादर केले नावीन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक प्रकल्प

पिंपरी, ता.१४ : सौर ऊर्जेचा वापर करून कमी खर्चात विजेची निर्मिती, घनकचरा व्यवस्थापन, पवनचक्की यावर आधारित विद्यार्थ्यांनी बनवलेले वैज्ञानिक प्रकल्प पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. निमित्त होते, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर येथे आयोजित ‘स्टेम मेला’ विज्ञान प्रदर्शनाचे.

प्रदर्शनाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सोनिया गरचा, प्रशिक्षणार्थी अधिकारी सुजाता जाधव, गिर्यारोहक शर्विका म्हात्रे आणि भोसरी विभागाच्या पर्यवेक्षिका सुनीता गिते यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन फुलसुंदर होत्या.
प्रदर्शनात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे एकूण ९५ प्रकल्प होते. विद्यार्थ्यांना रूपाली घोडेकर यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी स्टेम संस्थेच्या स्वाती पठारे यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन कल्पना पाचारणे यांनी केले. पालकांनी या प्रदर्शनाला भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेला चालना देण्यासाठी अशा प्रदर्शनांचे सातत्याने शिक्षण विभाग आयोजन करीत असते. विद्यार्थीदशेत विज्ञानाशी मैत्री व्हावी, यासाठी असे उपक्रम खूपच उपयुक्त ठरत असतात, असे मत सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी व्यक्त केले.

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांची कल्पकता दिसून आली. शिक्षण क्षेत्रासाठी हा सकारात्मक संकेत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासात वाढ होते. शिक्षण केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवण्यासाठी असे उपक्रम आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग सातत्याने राबवत असते.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT