पिंपरी, ता. १४ : लॉजमध्ये जाऊन एका तरुणाकडे दहा लाखांची खंडणी मागितली. तरुणावर कोयत्याने वार करीत दगडाने बेदम मारहाण करून सोनसाखळी हिसकावून घेतली. त्यानंतर लॉजच्या काउंटरवरील कामगारांना गोळ्या घालून मारण्याची धमकी देत काउंटरवरील पैसे लुटून दहशत माजवली. हा प्रकार चऱ्होली बुद्रूक येथील काटे कॉलनीतील शासकीय विश्राम गृहासमोरील काव्या लॉजमध्ये घडली.
याप्रकरणी सागर दत्तात्रेय निकम (वय ३६, रा. काजळे मळा, चऱ्होली बु.) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुड्ड्या ऊर्फ अनिकेत संजय मेटकर (वय २३), वात्या ऊर्फ महेश दिलीप कासार (वय २४, दोघेही रा. काळेवाडी), सोन्या मोरे (वय २०) व एक अल्पवयीन मुलगा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील मेटकर हा सराईत गुन्हेगार आहे. सहायक पोलिस निरीक्षक नितीन अंभोरे यांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे आळंदी नगर परिषदेत पाणी पुरवठा विभागात नोकरीला असून, ते काही वेळ विश्रांतीसाठी लॉजमध्ये गेले होते. दरम्यान, फिर्यादी हे एका रूममध्ये झोपलेले असताना आरोपी तेथे आले. मेटकर याने फिर्यादीकडे दहा लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात, पाठीवर, हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर फिर्यादीच्या गळ्यातील दोन लाख ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली. तर इतर आरोपींनी फिर्यादीला दगड फेकून मारले. दरम्यान, अल्पवयीन आरोपीने काउंटरवरील कामगारांना डोक्यात सहा ते सात गोळ्या घालून मारून टाकीन, अशी जीवे मारण्याची धमकी देत काउंटरवरील पैसे जबरदस्तीने घेत दहशत निर्माण केली.
-----------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.