पिंपरी-चिंचवड

मिरवणुका, फटाक्याची आतषबाजी अन् शिववंदना

CD

पिंपरी, ता. १८ ः शहरात रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताकांनी सजलेल्या कमानी, महिलांनी गायलेला शिवजन्माचा पाळणा... फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशाच्या गजरामध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुका, शिववंदना आणि जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात दुमदुमून गेलेला परिसर... असा उत्साही वातावरणात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त अनेक लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

नेहरूनगरमध्‍ये २५ फुटी अश्‍वारूढ शिवरायांची मूर्ती
नेहरूनगरमधील विविध मंडळांनी ‘एक गाव एक शिवजयंती’ साजरी केली. नेहरूनगरमध्ये रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताकांनी सजविण्यात आल्या होत्या. तसेच, स्वागत कमानी लावल्या होत्‍या. चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची २५ फुटी अश्‍वारूढ मूर्ती सजवली होती. सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली.

सांस्कृतिक कार्यक्रम
एक गाव एक शिवजयंती उत्सव समिती, श्री क्षेत्र टाळगाव चिखली यांच्यावतीने शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शंभरपेक्षा अधिक व्यक्तींनी रक्तदान केले. महापालिकेच्या कन्या शाळा क्रमांक ९१ च्या मुलींनी शिवजयंतीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सकाळी ७ वाजता शिवनेरीहून आणलेल्या शिवज्योतीचे पूजन करण्यात आले. तर सकाळी ९ वाजता सर्व महिलांनी शिवजन्माचा पारंपारिक पाळणा सादर केला. यानंतर श्री दादा महाराज नाटेकर गुरुकुल विद्यालयाच्या मुलांनी ‘वारसा स्वराज्याचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यानंतर शिवरायांच्या महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

‘छावा’चे प्रक्षेपण
सेवा विकास समिती मंडळाच्यावतीने संत तुकारामनगरमधील संत तुकाराम मंदिरात स्थानिक नागरिकांसाठी ‘छावा’ चित्रपटाचे प्रक्षेपण करण्यात आले. शिववाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय यादव, सेवा विकास समिती मंडळाचे अध्यक्ष विनय साळवी, उपाध्यक्ष शुभम वाघमारे, खजिनदार तुषार कातोरे, सचिव शुभम आल्हाट यांनी संयोजन केले होते.

जन्मोत्सव
चिंचवड-एम्पायर इस्टेट येथील जयहिंद शॉप, झेंडा चौकात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला. एम्पायर इस्टेट मित्र मंडळाचे अध्यक्ष शैलेश मोरे यांनी संयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporators Not Reachable : विधानपरिषदेचे राजकारण तापलं! काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल, भाजप आमदाराचा दावा

12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

Blood Group Stroke Risk: ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका? वाचा शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं काय

Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT