पिंपरी-चिंचवड

महाराष्ट्र अंनिसच्या जिल्हाध्यक्षपदी मानव कांबळे

CD

पिंपरी, ता. १८ ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पुणे जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांची निवड करण्यात आली. पुणे जिल्हा कार्यकारिणीची निवड रविवारी (ता. १६) चिंचवड येथे पार पडलेल्या जिल्हा प्रेरणा मेळाव्यात जाहीर करण्यात आली. या मेळाव्यास जिल्ह्यातील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि चाकण या शाखांचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवड प्रक्रिया राज्य कार्यकारिणी सदस्य दिगंबर कट्यारे, अॅड. मनीषा महाजन आणि उत्तम जोगदंड यांच्या देखरेखीत पार पडली.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
जिल्हा उपाध्यक्ष वनिता फाळके आणि बाळासाहेब घस्ते, जिल्हा कार्याध्यक्ष सम्यक वि.म, जिल्हा प्रधान सचिव संजय बारी आणि मनोहर पाटील, विवेक जागर प्रकाशन व वितरण विभाग कार्यवाह गंगाधर सत्वधर, विविध उपक्रम विभाग कार्यवाह एकनाथ पाठक, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग कार्यवाह अतुल सवाखंडे, महिला सहभाग विभाग आणि कायदेविषयक व्यवस्थापन विभाग कार्यवाह अॅड. परिक्रमा खोत, युवा सहभाग विभाग कार्यवाह अरिहंत अनामिका, विवेकी निवड विभाग कार्यवाह सतीश जाधव, पूनम जाधव, सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग कार्यवाह राहुल उजागरे, सोशल मीडिया विभाग कार्यवाह कृष्णा भिसे, संविधान जागर अभियान विभाग कार्यवाह नम्रता ओव्हाळ मोरे, विज्ञान बोध वाहिनी विभाग कार्यवाह महेश कालिदास घाडगे आदींची निवड करण्यात आली. संजय बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. सम्यक वि. म. यांनी प्रास्ताविक केले. संजय बारी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT