पिंपरी-चिंचवड

महाडीबीटी पोर्टलवर चूक; मात्र विद्यार्थांचा खिसा हलका

CD

पिंपरी, ता.१८ ः राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजने अंतर्गत शहरी पात्र विद्यार्थ्‍यांना ६० हजार रुपये भत्ता देण्यात येतो. परंतु महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना पिंपरी-चिंचवड विभाग निवडण्याच्या पर्याय उपलब्ध नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्त्याची रक्कम ६० हजार रुपयांऐवजी ३८ हजार रुपये इतकी दाखविली जात आहे. या तांत्रिक त्रुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांना लाभाची रक्कम कमी मिळत असल्याने प्रती विद्यार्थी २२ हजार रुपयांचा फटका बसत असल्याची वस्तुस्थिती आहे.
राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेमध्ये शासन निर्णयानुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता ३२ हजार रुपये, निवास भत्ता २० हजार रुपये आणि निर्वाह भत्ता ८ हजार रुपये असे एकूण ६० हजार रुपयांची रक्कम दिली जाते.

तालुका विभागात टाकल्याने गोंधळ
त्याचवेळी इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित ‘क’ वर्ग महापालिका क्षेत्रामध्‍ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५१ हजार रुपये, इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना ४३ हजार रुपये आणि तालुका ठिकाणी उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना ३८ हजार रुपयांचा भत्ता देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. परंतु प्रत्यक्षात महाडीबीटी पोर्टलवर पिंपरी-चिंचवड शहराला ‘तालुका विभागात’ टाकल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

(आकडे रुपयात)
अ.क्र. / भत्ता / प्रमुख शहरातील विद्यार्थी / इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थी / इतर जिल्ह्यांच्या ठिकाणचे विद्यार्थी / तालुक्यातील विद्यार्थी

१ भोजन भत्ता - ३२,०००/ २८,०००/ २५,०००/ २३,०००/

२ निवास भत्ता - २०,०००/ १५,०००/ १२,०००/ १०,०००/


३ निर्वाह भत्ता ८,०००/ ८,०००/ ६,०००/ ५,०००/

एकूण रक्कम - ६०,०००/ ५१,०००/ ४३,०००/ ३८,०००/


३१ मार्च शेवट मुदत
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ३१ मार्च २०२५ ही शेवट मुदत आहे. त्यामुळे ही त्रुटी लवकरात लवकर दूर करून लाभाची पूर्ण रक्कम मिळविण्यासाठी विद्यार्थी राज्य शासनाकडे मागणी करत आहेत. ३१ मार्चपर्यंत त्रुटी दूर होतील का? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांना सतावत आहे.

विद्यार्थी म्हणतात...
‘‘डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्याच्या त्रुटीबाबत महाडीबीटी पोर्टलवर मी स्वतः गेल्या ३८ दिवसांपासून आठ तक्रारी व ४ ते ५ इ-मेल पाठवून सुद्धा या त्रुटीचे निवारण झाले नाही. आम्हा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.
- सम्मेद गिरमल, साक्षी पिंगळे, विद्यार्थी


मी स्वतः वारंवार तंत्रशिक्षण संचालनालयाकडे सुद्धा इ-मेल व फोनद्वारे संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला. पण कोणत्याही प्रकारच्या समस्येचे निराकरण झाले नाही. राज्य सरकार पोर्टलवर तक्रार नोंदवून ३० पेक्षा जास्त दिवस झाले. त्यावरही कोणते स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
- अनिकेत खळदकर - सत्यम कोटे, विद्यार्थी

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्याच्या योजनेत तांत्रिक त्रुटी आहेत. पिंपरी-चिंचवड विभागाचा पर्याय महाडीबीटी पोर्टलवर
उपलब्ध नसल्यामुळे या हद्दीतील विद्यार्थ्यांना फक्त ३८ हजार भत्ता मिळत आहे.
- अभिनय चौहान - सुरभी घोष, विद्यार्थी

पिंपरी-चिंचवड शहरासाठी अर्ज करताना अडचण येत आहे. अर्ज करताना तालुका हवेली टाकल्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा भत्ता लागू होत आहे, अशा तक्रारी प्राप्त झाल्‍या आहेत. महाडीबीटीला कळविले आहे. त्यात त्यांनी दुरूस्ती केली आहे.
- दादा शेळके, कार्यालयीन अधीक्षक, तंत्र शिक्षण संचालनालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, थांबलेल्या ट्रकला कारची धडक; माय-लेकीचा मृत्यू, बाप-लेक गंभीर जखमी

Gokul Dudh Sangh Politics : मुश्रीफांना घेऊनच महायुतीचे पॅनेल, आमदार शिवाजी पाटील यांचा पत्ता कट?; गोकुळच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का ! ८० लाख महिलांचा लाभ बंद, आता ई-केवायसीलाही मुदवाढ नाही; नेमकं कारण काय?

Rajesh Tope: शरद पवार गटाला धक्का? राजेश टोपे खरंच भाजपमध्ये जाणार? अखेर स्वतः टोपेंनीच दिलं स्पष्ट उत्तर!

Konkan Railway: ‘वंदे भारत’, ‘तेजस’च्या फेऱ्यांत १५ जूनपासून कपात; कोकण रेल्वे मार्गावर मॉन्सून वेळापत्रक, गाड्यांच्या वेळाही बदलणार

SCROLL FOR NEXT