पिंपरी-चिंचवड

टेट्रा पॅक, जेसीबी, पीसीएमसीची विजयी सलामी

CD

पिंपरी, ता. १८ ः औद्योगिक क्रीडा संघटनेच्यावतीने आयोजित ६१ व्या व्हॉलीबॉल (पासिंग) स्पर्धेला मंगळवारी (ता. १८) शानदार सुरुवात झाली. टेट्रा पॅक, जेसीबी, पीसीएमसी, एसकेएफ आणि टाटा मोटर्स ‘अ’ संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना नमवत विजयी सलामी दिली.
फॉरविया फोरेशिया कंपनीच्या पुढाकाराने पिंपरीतील टाटा मोटर्स विभागीय प्रशिक्षण वसतीगृहाच्या मैदानावर वरील स्पर्धा भरविण्यात आली आहे. स्पर्धेच्या उद्‍घाटन प्रसंगी प्राज इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष विजय कुमार, मनुष्यबळ विकास विभाग (एचआर) प्रमुख मिलिंद बावा, टाटा मोटर्सचे आयआर प्रमुख अखिलेश पांडे, एचआर प्रमुख अतुल अहिरे, व्यवस्थापक (एचआर) प्रवीण तांबे, टाटा मोटर्स युनियन स्पोर्ट्स कमिटी अध्यक्ष शशिकांत कात्रे, औद्योगिक क्रीडा संघटनेचे सचिव वसंत ठोंबरे, उपाध्यक्ष नरेंद्र कदम, खजिनदार प्रदीप वाघ, सहखजिनदार विजय हिंगे, जेसीबी क्रीडा समितीचे सचिन कांबळे, व्यवस्थापक (एचआर) अमर शिंदे, बजाज ऑटो चाकणचे व्यवस्थापक (एचआर) गोविंद डालिमकर, महिंद्रा ॲण्ड महिंद्राचे श्रीनिवास मोरे, एसकेएफचे संतोष शिंदे, मंदार कुलकर्णी आदी उपस्थित होते.
प्रणीत गावांडगावे, सागर पाटेकर, अमित महामुनी, संतोष भिसे, महेश बिरादार, अमित ताकवले, चिकित्सा जोशी यांनी स्पर्धेचे संपूर्ण आयोजन केले आहे. हरी देशपांडे यांनी स्पर्धा प्रमुख म्हणून काम पाहिले. ऋषिदा जाधव, अनिकेत आवटे यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात टेट्रा पॅक संघाने बजाज ऑटो, आकुर्डी संघाला २५ - १४, २५ - १० असे हरविले.
तर प्राज इंडस्ट्रीज संघाला जेसीबी विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात जेसीबी ११ - २५, १६ - २५ असा पराभव पत्करावा लागला.


एकूण १२ संघांचा सहभाग
या स्पर्धेमध्ये टाटा मोटर्स, फॉरविया, जेसीबी, एसकेएफ, बजाज ऑटो चाकण, बजाज ऑटो आकुर्डी, पीसीएमसी, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, टेट्रा पॅक वगैरे एकूण १२ संघांनी सहभाग नोंदवलेला आहे.

अन्य निकाल पुढील प्रमाणे -
पीसीएमसी वि.वि. फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स २५ - ६, २५ - १२. फॉरविया फोरेशिया पराभूत वि. एसकेएफ २३ - २५, २४ - २६. टाटा मोटर्स ‘अ’ विरुद्ध टाटा मोटर्स ‘ब’ २५ - १७, २५ - १९.

PNE25U98841

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉकड्रिलवेळी हातात फुटलं ग्रेनेड, ४ पोलीस गंभीर जखमी; अहिल्यानगरमध्ये दुर्घटना

जास्त भावुक नका होऊ! कॉकरोच जनता पार्टीविरोधात याचिका, सरन्यायाधीश काय म्हणाले?

Share Market: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे शेअर बाजारातील या 3 शेअरमध्ये मोठी तेजी!

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात पेट्रोल चोरांचा धुमाकूळ; राजारामपुरीतील रहिवासी त्रस्त

Electricity Bill Reducing Tips : उन्हाळ्यात लाईट बिल प्रचंड वाढवतात 'ही' 3 छोटी उपकरणे, आजच वापर करा कमी

SCROLL FOR NEXT