आमच्या घरातील कुंडीत वडाचे झाड उगवले होते. ते कुठेतरी लावण्याचा विचार आम्ही बरेच दिवस करीत होतो. वृक्षारोपणच नव्हे तर वृक्षसंवर्धनही होणार असल्याचे ‘सकाळ’मध्ये वाचले. त्याच दिवशी या नावीन्यपूर्ण उपक्रमात सहभागी व्हायचे ठरविले. मी आणि पती दोघेही या उपक्रमात सहभागी झालो.
- प्रतिभा कुंजीर, चिंचवड
---
आमच्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा (एनएसएस) गट आहे. श्रमदान करण्यासाठी आम्ही दरवर्षी विविध ठिकाणी जातो. त्यावेळी वृक्षारोपणही करतो. हा उपक्रमात आमचे ६५ ते ७० जण सहभागी झाले. - मैत्रेयी भोईटे, एनएसएस समन्वयक, पीसीसीओई
---
आज धावपळीच्या युगात नैसर्गिक संकटांनाही सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर अशा हरित उपक्रमांमुळे निसर्गाशी पुन्हा नाते जोडण्याची आणि आणि आपली वसुंधरा वाचविण्याची सुवर्णसंधी यशदा रिअॅल्टी आणि ‘सकाळ’मुळे मिळाली. अशा उपक्रमांमुळे आपण पुढील पिढ्यांसाठी निरोगी व सुरक्षित वातावरण देऊ शकू. यशदा रिअॅल्टीच्या बांधिलकीची आणि ‘सकाळ’च्या सहकार्याची ही भावना निश्चितच प्रेरक आहे.
- श्रद्धा कथले, रावेत
---
मी इयत्ता पाचवीत शिकते. आपण झाडे लावायला जाणार असल्याचे घरच्यांनी मला सांगितले. मलाही झाड लावायला आवडते, म्हणून मी आले. मी कांचन झाड लावले. ते लावताना मला खूप छान वाटले.
- आरोही आहिरेकर, पिंपरी
---
पुढच्या पिढीसाठी स्वच्छ आणि सुंदर भविष्य निर्माण करण्यासाठी आपण वृक्षारोपण केले पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनीच आपला थोडा वेळ निसर्गासाठी दिला पाहिजे. वृक्षारोपण उपक्रमात आम्ही प्रथमच सहभागी झालो. यापुढे जेव्हा संधी मिळेल तेव्हा अशा उपक्रमात सहभागी होऊ.
- श्वेता धांडे, पिंपरी
-----
मी इयत्ता आठवीत शिकते. आमच्या शाळेत परसबाग आहे. आम्ही तेथे पालापाचोळा तसेच कचऱ्यापासून जैविक खत बनवितो. मी आज दोन झाडे लावली. या उपक्रमातील सहभागाचा अनुभव खूप चांगला होता.
- करण जाधव, देहूगाव
---
माझे वय ५५ असून मी एका खासगी कंपनीत कामाला आहे. वृक्षारोपण उपक्रमाबाबत ‘सकाळ’मध्ये वाचले होते. त्यामुळे मी आज आवर्जून आलो. मी अर्जुन झाड लावले. हे झाड मी आईच्या नावाने लावले.
- सतीश अश्रित, निगडी
---
मी आज पिंपळाचे झाड लावले. माझा मुलगा अविघ्नच्या नावाने हे झाड लावले. पुढच्या पिढीसाठी प्रत्येकाने तीन महिन्यात एकतरी झाड लावले पाहिजे. ‘सकाळ’तर्फे हा उपक्रम छान खूप छान पद्धतीने राबविण्यात आला. - सुमीत भोकरे, चिंचवड
-----
झाड लावून मला खूप समाधान लाभले. मी अश्वत्थाचे झाड लावले आहे. अश्वत्थ वृक्षाचा उल्लेख महाभारतात आणि भगवद्गीतेत आहे. अश्वत्थ वृक्ष लावण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. त्याबद्दल मी ‘सकाळ’ आणि यशदा रिअॅल्टी यांचा खूप आभारी आहे.
- दिलीप कानगुडे, निगडी
---
आम्ही दरवर्षी विविध किल्ल्यांवर जात असतो. आम्ही बरोबर देशी वृक्षांच्या ३० ते ४० किलो बिया घेऊन जातो. गड चढताना आणि वर गेल्यावरही आम्ही या बिया लावतो. आज वृक्षारोपणाच्या स्तुत्य उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद होतो आहे.
- संतोष दरेकर, पिंपळे सौदागर
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.