पिंपरी-चिंचवड

माय फ्रेंड श्रीगणेशा दहा

CD

माय फ्रेंड श्रीगणेशा दहा ः पीतांबर लोहार
--
कृपावंत

रसिक श्रोतेजणहो, आपल्या लाडक्या गणरायाचे, लाडक्या गणपती बाप्पाचे जगद्‍गुरू, जगद्‍वंदनीय संत श्री तुकोबाराय यांनी वर्णन केलेल्या,
धरोनियां फरश करी ।
भक्तजनाचीं विघ्नें वारी ।।
ऐसा गजानन महाराजा ।
त्याचें चरणीं हालो लागो माझा ।।
या अभंगाचे निरुपन करण्याचा प्रयत्न तोडक्या मोडक्या शब्दांत केला आहे. ते आपण श्रवण केले. त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो, असे सांगून कीर्तनकार महाराज श्रोत्यांना सांगतात की, झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, श्रीगणरायाच्या चरणी अर्पण करतो. आपणही जे जे माझ्याकडून चांगले सांगितले गेले असेल, ते ते जगद्‍गुरू संत तुकोबारायांचे विचार आहेत, असे म्हणून स्वीकारावेत. मिथ्य असेल ते सोडून द्यावे. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून काही वेडावाकडा शब्द उच्चारला गेला असेल, तर ते शब्द माझे म्हणून मला परत द्या,’ अशा शब्दांत कीर्तनकार महाराज कीर्तनसेवेचा समारोप करू लागले. त्यासाठी त्यांनी रसिकश्रोत्यांची क्षमा मागितली. पंढरीच्या पांडुरंगाची क्षमा मागितली. संतशिरोमणी ज्ञानोबा माउली यांची क्षमा मागितली. त्यासाठी माउलींना उद्देशून संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेला ‘करा क्षमा अपराध’ या अभंगाचा आधार घेतला. या अभंगात संत तुकाराम महाराज हे संत ज्ञानेश्‍वर माउलींकडे आपल्या अज्ञानामुळे काही चूक झाली असल्यास ती मान्य करतात. आपल्याला अधिकार नसल्याचे मान्य करत क्षमायाचना करतात. संत ज्ञानेश्वर महाराजांना उद्देशून संत तुकाराम महाराज म्हणतात की, मी आपला सेवक आहे. किंकर आहे. मला आपल्या चरणी स्वीकारावे. यातून तुकोबारायांची नम्रता दिसून येते. त्यांची विचारी वृत्ती दिसून येते. इतरांना क्षमा मागण्याची तयारी दिसून येते. अशा या तुकोबारायांनी, गणपतीचेही वर्णन आपल्या ‘धरोनियां फरश करी। भक्तजनाचीं विघ्नें वारी।।’ या अंभगातून केले आहे. त्याचे माझ्या समजेनुसार अल्पमतीनुसार निरूपण करण्याचा, विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. गणपतीच्याच कृपाशीर्वादाने मी त्यांच्याप्रति असलेले विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या गणरायाची, गणपती बाप्पाची, मोरयाची, मंगलमूर्तीची कृपा माझ्यावर होणारच आहे. कारण, तो गणराय कृपावंत आहे. आपण रसिक श्रोतेजणही गेले दोन तास माझे विचार ऐकून घेतलेत. त्यात तल्लीन झालात. त्या भगवंताची, गणरायाची कृपा आपल्यावरही होवो, अशी मी प्रार्थना करतो आणि माझ्या निरुपणास पूर्णविराम देतो.
जयऽ विठ्ठल, जय हरि विठ्ठलऽऽ
जयऽ विठ्ठल, जय हरि विठ्ठलऽऽ
बोलिलीं लेंकुरें। वेडी वांकुडी उत्तरें।।
करा क्षमा अपराध। महाराज तुम्ही सिद्ध।।
नाहीं विचारिला। अधिकार म्यां आपुला।।
तुका ह्मणे ज्ञानेश्वरा। राखा पायापें किंकरा।।
कीर्तनकार महाराजांसह गायक आणि टाळकरी साथ देत अभंग गायन पूर्ण झाले आणि कीर्तनकार महाराजांनी नामस्मरण सुरू केले,
‘ज्ञानदेवऽ तुकारामऽऽ’
साधकही त्यांच्यामागे म्हणू लागले
‘ज्ञानदेवऽ तुकारामऽऽ’
‘ज्ञानदेवऽ तुकारामऽऽ’ नामाची पुन्हा पुन्हा आळवणी करत सर्वांचाच स्वर टीपेला पोहोचला आणि
तुकारामऽ तुकारामऽऽ तुकारामऽऽऽ तुकारामऽऽऽ
म्हणत सर्वांचाच स्वर खाली आला. टाळ व मृदंगवादकनाचा नादही त्याच प्रमाणात कमी करत ‘तुकारामऽ तुकारामऽऽ’ नामाचा गजर थांबला आणि कीर्तनकार महाराजांनी एका उंच स्वरात गजर केला,
बोला पुंडलिकऽ वरदेऽऽ हरिऽ विठ्ठलऽऽ
श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽऽ
पंढरीनाथ भगवान की जयऽऽऽ
माउली ज्ञानेश्वर महाराज कीऽ जयऽऽ
संत तुकाराम महाराज कीऽ जयऽऽ
आदिशक्ती मुक्ताबाई कीऽ जयऽऽ
सब संतन्ऽऽऽ कीऽ जयऽऽ
भारत माता कीऽ जयऽऽ
बोलाऽ गणपती बाप्पाऽऽ मोरयाऽऽऽ
मंगलमूर्तीऽ मोरयाऽऽऽ

असा जयघोष करून महाराज खुर्चीवर बसले. त्यांच्यासाठी संयोजकांनी खुर्ची आणून ठेवली होती. दोन तास उभे राहून कीर्तन केल्यानंतर महाराजांना बसण्यासाठी खुर्ची असावी, याची जाणीवपूर्वक आठवण ठेवून त्यांनी व्यवस्था केली होती. गायक व टाळकरीही खाली बसले. श्रोत्यांनी महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मीही दर्शन घेतले आणि घराकडे निघालो होतो. घरी गणरायाची प्रतिष्ठापना करायची होती. समोरून आलेल्या व्यक्तीने ‘रामकृष्णहरि’ म्हणत नमस्कार केला. मीही हात जोडून थोडं वाकून नम्रपणे म्हणालो, ‘रामकृष्णहरि’ ‘रामकृष्णहरि’ आणि निघालो घराकडे लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून रात्री दहा वाजता ८५१७ क्युसेकचा विसर्ग सुरु

Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

Pune News : सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की? भेकराईनगर गोशाळा येथील प्रकार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या २६ लाख लाभार्थी महिलांची सुक्ष्म छाननी; आदिती तटकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT